बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा ही जरी इंडस्ट्रीमध्ये कार्यरत नसली तरी खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून नव्याचे नाव हे अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीशी जोडले जात होते. ते दोघे रिलेशनशीपमध्ये असल्याचे म्हटले जात होते. पण दोघांनीही यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती.
(instagram)अनेकदा सिद्धांत आणि नव्या एकत्र फिरायला गेल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी कधीही एकत्र फोटो शेअर केला नसला तरी ते एकाच ठिकाणी असल्याचे दिसत होते.
(instagram)२०२२मध्ये दोघांच्या नात्याविषयी चर्चा सुरु झाल्या होत्या. पण त्यांच्याशी संबंधीत एक वाईट बातमी समोर आली आहे.
(instagram)बॉलिवूड हंगामाने दिलेल्या वृत्तानुसार, सिद्धांत आणि नव्याचा ब्रेकअप झाला आहे. ते दोघांचा ब्रेकअप जरी झाला तरी त्यांच्यामध्ये मैत्री कायम असणार आहे.
(instagram)