Shweta Tiwari On Palak Tiwari-Ibrahim Ali Khan Dating Rumours: श्वेता तिवारी ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. आपल्या कारकिर्दीत श्वेताने अनेक हिट टीव्ही शो देण्याबरोबरच बॉलिवूड आणि भोजपुरी सिनेमातही काम केले आहे. श्वेताप्रमाणेच तिची मुलगी पलक तिवारीदेखील इंडस्ट्रीत आपला ठसा उमटवण्याचा प्रयत्न करत आहे. प्रोफेशनल लाइफसोबतच पलक पर्सनल लाईफमुळेही चर्चेत असते. सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खानसोबत तिचे नाव जोडले जात आहे. आता त्यावर पलकची आई, अभिनेत्री श्वेता तिवारीने
श्वेता तिवारीने नुकताच 'Galatta'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने मुलगी पलक तिवारी आणि इब्राहिम अली खान यांच्या अफेअरच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे. 'पलक आता खूप मजबूत आहे, पण उद्या कोणतीही टिप्पणी किंवा वाद तिचा आत्मविश्वास डळमळीत करू शकतो. ती अजून लहान आहे. कधी कधी गोष्टी इतक्या क्रूर होतात, जसे की तिचे इतर प्रत्येक पुरुषाशी अफेअर आहे! किती दिवस ती हे सगळं सहन करेल हे ही मला माहित नाही. तिच्या डेटिंगच्या अफवांमुळे ती आश्चर्यचकित ही झाली आहे. ती त्याची खिल्ली उडवते, पण काही वेळा अशा गोष्टी तिला त्रास देऊ शकतात' असे श्वेता म्हणाली.
श्वेताच्या बोलण्यावरून स्पष्ट होते की, 'अशा बातम्यांमुळे ती नाराज आहे, पण पलक त्यांना चांगल्या प्रकारे सामोरे जाऊ शकते याची तिला खात्री आहे. तसेच पलकला तिच्या फिगरमुळे देखील ट्रोल करण्यात आले आहे. त्यावर देखील श्वेताने प्रतिक्रिया दिली आहे. 'पलकला फिगरवरुन ट्रोल केल्यामुळे त्रास होत नाही. सुरुवातीला तिला वाईट वाटायचे, पण आता तिला माहिती आहे की अनेकांना तिच्यासारखे दिसायचे आहे. मला माहित आहे की तिने यासाठी खूप मेहनत घेतली आहे.'
वाचा: रणवीर सिंगनंतर अभिनेत्रीने केले अर्धनग्न अवस्थेत फोटोशूट, नेटकऱ्यांनी केली जोरदार टीका
अभिनेत्री पलक तिवारी ही ‘किसी का भाई किसी का जान’ या चित्रपटात दिसली होती. तसेच तिचा ‘बिजली बिजली’ हा अल्बम देखील चांगला हिट ठरला होता. बॉलिवूडचा दबंग खान सलमान या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. त्याच्यासोबत पूजा हेगडे, शहनाज गील, पलक तिवारी या अभिनेत्री दिसल्या होत्या. आता चाहत्यांमध्ये पलकच्या आगामी प्रोजेक्टची उत्सुकता आहे.