मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Shweta Tiwari: एकेकाळी ५०० रुपयांसाठी धडपडावं लागलं अन् आता आहे कोट्यधीश

Shweta Tiwari: एकेकाळी ५०० रुपयांसाठी धडपडावं लागलं अन् आता आहे कोट्यधीश

Aarti Vilas Borade HT Marathi
Oct 04, 2022 12:01 PM IST

Shweta Tiwari Birthday: वयाची ४० ओलांडूनही श्वेता आज अतिशय फिट आणि सुंदर आहे. ती कायम चर्चेत असते.

श्वेता तिवारी
श्वेता तिवारी (HT)

छोट्या पडद्यावरील अतिशय हॉट आणि सुंदर अभिनेत्री म्हणून श्वेता तिवारी ओळखली जाते. तिचे बोल्ड फोटो कायमच चर्चेचा विषय ठरत असतात. वयाची ४० ओलांडली असली तरी श्वेता तितकीट सुंदर आणि फिट दिसते. आज ४ ऑक्टोबर रोजी श्वेताचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया श्वेता विषयी काही खास गोष्टी...

श्वेताने आजवर अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. तिची प्रत्येक भूमिका ही प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरली होती. प्रोफोशनल लाइफसोबतच श्वेताची पर्सनल लाइफसुद्धा चर्चेत आहे. तिने दोन वेळा लग्न केले. पण दोन्हीही लग्न अयशस्वी ठरली. श्वेताच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले. आज श्वेता सिंगल मदर आहे. ती तिच्या दोन्ही मुलांचा सांभाळ करते.
आणखी वाचा : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने वरळीत खरेदी केले नवे घर, किंमत वाचून व्हाल थक्क

वयाच्या १२व्या वर्षी श्वेताने एका ट्रॅव्हल एजन्सीसाठी काम करण्यास सुरुवात केली होती. तिला या साठी ५०० रुपये मिळायचे. त्यानंतर श्वेताने काही भोजपूरी चित्रपटांमध्ये काम केले. या चित्रपटांमुळे तिला लोकप्रियता मिळाली. त्यानंतर तिने पंजाबी आणि नेपाळी चित्रपटांमध्येही नशीब आजमावले. पण एकता कपूरच्या 'कसौटी जिंदगी की' या मालिकेने तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. या पहिल्या वहिल्या मालिकेने तिला यशाच्या शिखरावर पोहोचवले.

४१ वर्षांच्या श्वेताकडे आज कोट्यावधी रुपयांची संपत्ती आहे. ती ८१ कोटी रुपयांची मालकीण आहे. तिचे कांदिवली येथील हायराइज अपार्टमेंटमध्ये स्वत:चे घर आहे. तिच्याकडे BMW 7 सीरीजची 730 LD कार आहे. या कारची किंमत सुमारे १.३८ कोटी रुपये आहे. तसेच ४७.६० लाख रुपयांची Audi A4 ही गाडी देखील तिच्याकडे आहे.

WhatsApp channel

विभाग