भारतीय क्रिकेट संघातील स्टार ओपनर शुभमन गिल सध्या चर्चेत आहेत. तो त्याच्या खेळामुळे नाही तर खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून शुभमन बॉलिवूड अभिनेत्री अभिनेत्री सारा अली खानसोबत रिलेशनशीपमध्ये असल्याचे म्हटले जात आहे. मात्र एका मुलाखतीमध्ये त्याने दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना आवडत असल्याचे सांगितले. त्यावर आता सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.
अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा यांच्या अफेअरच्या चर्चा सुरु आहेत. सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंवरुन ते दोघे एकमेकांना डेट करत असल्याचे म्हटले जात आहे. दोघांनीही अद्याप यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. अशातच शुभमनने त्याला रश्मिका आवडत असल्याचे म्हणताच विजयच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.
वाचा: मराठी पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावणार ‘श्रीवल्ली’; रश्मिकाला पाहण्यासाठी चाहते उत्सुक!
एका यूजरने 'ती विजयची गर्लफ्रेंड आहे' असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने 'विजय देवरकोंडा शुभमनचे ठिकाण शोधत आहे' अशी कमेंट केली आहे. तिसऱ्या एका यजूरने शुभमनला टॅग करत 'विजय देवरकोंडाला तुझे ठिकाण हवे आहे' असे म्हटले आहे.
काय आहे प्रकरण?
शुभमनने नुकताच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याला कोणत्या अभिनेत्रीवर क्रश आहे? असा प्रश्न विचारण्यात आला होता. सुरुवातीला शुभमनने या प्रश्नाचे उत्तर देणे टाळले. पण नंतर त्याने उत्तर दिले. सर्वांना वाटले होते की शुभमन सारा अली खानचे नाव घेणार. मात्र त्याने रश्मिका मंदानाचे नाव घेतले.
रश्मिका आणि विजय देवरकोंडा हे सध्याचे सर्वांचे आवडते कपल आहे. त्यांनी प्रेमाची कबूली दिली नसली तरी त्यांचे अफेअर असल्याचा दावा केला जातो. आता शुभमनने रश्मिका आवडत असल्याचे सांगताच विजयच्या चाहत्यांनी सुनावले आहे.