मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Shruti Haasan: नागा चैतन्याच्या प्रेमात होती श्रुती हासन, मात्र बहिणीसाठी...
श्रुती हासन
श्रुती हासन (HT)

Shruti Haasan: नागा चैतन्याच्या प्रेमात होती श्रुती हासन, मात्र बहिणीसाठी...

28 January 2023, 7:43 ISTAarti Vilas Borade

Shruti Haasan Birthday: ज्येष्ठ अभिनेते कमल हासन यांची मुलगी श्रुती हासन ही नेहमी चित्रपटांपेक्षा खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिली आहे. आज तिच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया तिच्याविषयी खास गोष्टी...

दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेते कमल हासन यांची मुलगी, अभिनेत्री श्रुती हासन ही कायच चर्चेत असते. तिने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. श्रुतीने आजवर अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले आहे. आज २८ जानेवारी रोजी तिचा ३५ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्याविषयी काही खास गोष्टी...

ट्रेंडिंग न्यूज

श्रुती हासन ही तिच्या चित्रपटांपेक्षा नेहमी खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. श्रुतीचे नाव बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर ते सामंथा रुथ प्रभूचा पूर्वश्रमीचा पती नागा चैतन्यपर्यंत बऱ्याच अभिनेत्यांशी जोडले गेले होते. एका मुलाखतीमध्ये श्रुतीने रणबीरसोबतच्या अफेअरच्या अफवा असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर नागा चैतन्य आणि तिचे अफेअर असल्याचे म्हटले जात होते.
वाचा: ही तर सुरुवात आहे; सुमीत राघवनच्या 'त्या' ट्वीटला फडणवीस यांचा गाण्यातून रिप्लाय

काही मीडिया रिपोर्ट्सनुसार २०१३ साली नागा चैतन्य आणि श्रुती हासन एकमेकांना डेट करत होते. ते दोघे एकमेकांच्या अखंड प्रेमात होते. श्रुती आणि नागा चैतन्य लग्न करणार असल्याचे म्हटले जात होते. एक अवॉर्ड शोमधील त्यांची जवळीक पाहून या चर्चांना उधाण आले होते. पण नंतर त्यांच्यामध्ये भांडणे होऊ लागली. विशेष म्हणजे या दोघांच्या ब्रेकअपचं जे कारण समोर आलं त्यामुळे त्यांचे चाहतेही हैराण झाले होते.

श्रुती आणि नागा चैतन्यच्या ब्रेकअप मागे तिची बहिणी अक्षरा असल्याचे म्हटले जात आहे. श्रुती, अक्षरा आणि नागा चैतन्य एका कार्यक्रमासाठी गेले होते. ज्यात श्रुती परफॉर्म करत होती. दरम्यान नागा चैतन्य आणि अक्षरा यांना तिथून निघायचे होते. पण श्रुती त्यांच्यासोबत जाऊ शकत नसल्याने नागा चैतन्यला तिने अक्षराला घरी सोडण्यास सांगितले होते. नागाला ते जमले नाही. त्यामुळे त्या दोघांमध्ये वाद झाला आणि नंतर ब्रेकअप झाला. काही दिवसांपूर्वीच नागा चैतन्य आणि समांथाचा घटस्फोट झाला.

विभाग