श्रिया शर्माने मालिकेत स्नेहा बजाजची भूमिका साकारली होती. त्यावेळी तिच्या अभिनयासाठी श्रियाला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता.
कसौटी जिंदगी की' ही हिंदी मालिका एकेकाळी छोट्या पडद्यावर खूप गाजली होती. या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं होतं. मालिकेची मुख्य नायिका असणाऱ्या श्वेता तिवारी म्हणजेच प्रेरणाची छोटी मुलगी स्नेहा बजाज तुम्हाला आठवते का? वाचा आता ती काय करते
कार्यक्रमात स्नेहा बजाजची भूमिका करणाऱ्या या चिमुकलीचं खरं नाव श्रिया शर्मा आहे. बालपणी एकामागून एक अशा अनेक जाहिरातींमध्ये ती दिसली होती. मात्र आता ती कशी दिसते याची उत्सुकता तुम्हाला असेलच.
आता श्रिया मोठी झाली आहे आणि खूप सुंदर दिसते! परंतु, बालपणीचे तिच्या चेहऱ्यावरचे ते गोड भाव आजही तिच्या चेहऱ्यावर दिसतात. ती हिमाचल प्रदेशची रहिवासी आहे. अगदी लहान वयातच उत्कृष्ट अभिनयासाठी श्रियाला बाल कलाकाराचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
श्रिया आता २५ वर्षांची आहे. ती हिंदी चित्रपटांमध्ये फारशी दिसत नसली, तरी दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये तिने चांगलं जम बसवला आहे. तिने कन्नड, मल्याळम, तामिळ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.