मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Shreyas Talpade: प्रत्येक मनाचं बघणं वेगळं! श्रेयस तळपदेच्या 'ही अनोखी गाठ' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

Shreyas Talpade: प्रत्येक मनाचं बघणं वेगळं! श्रेयस तळपदेच्या 'ही अनोखी गाठ' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

Aarti Vilas Borade HT Marathi
Feb 13, 2024 08:51 AM IST

Hee Anokhi Gaath Trailer: चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन महेश वामन मांजरेकर यांनी लिहिलेली असून चित्रपटात श्रेयस तळपदे महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे.

Hee Anokhi Gaath Trailer
Hee Anokhi Gaath Trailer

Hee Anokhi Gaath Movie Trailer: 'काकस्पर्श', 'नटसम्राट', 'पांघरूण' या विलक्षण प्रेमकहाणीनंतर महेश मांजरेकर पुन्हा एकदा एक अनोखी प्रेमकहाणी घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाले आहेत. 'ही अनोखी गाठ' असे या चित्रपटाचे नाव असून काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. या चित्रपटाविषयी अधिक जाणून घेण्याची उत्सुकता असतानाच आता 'व्हॅलेंटाईन वीक'मध्ये या चित्रपटाचे जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित झाले आहे. हा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहे.

'ही अनोखी गाठ' चित्रपटाच्या २ मिनिटे ५० सेकंदाच्या ट्रेलरमध्ये एक अनोखी लव्हस्टोरी पाहायला मिळत आहे. वडिलांनी लग्न ठरवले म्हणून एका मुलीचा विवाह श्रेयसशी करण्यात येतो. त्या मुलीचे दुसऱ्या एका मुलावर प्रेम असते. त्यामुळे श्रेयस तिला तिच्या बॉयफ्रेंडकडे सोडण्याचा निर्णय घेतो. दरम्यान, दोघे एकमेकांमध्ये गुंतून पडतात. आता ती मुलगी बॉयफ्रेंडला विसरुन श्रेयससोबत करणार का संसार? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. या प्रश्नाचे उत्तर प्रेक्षकांना चित्रपट प्रदर्शित झाल्यावर मिळणार आहे.
वाचा: अभिनेता अर्शद वारसी पुन्हा लग्न करणार! तारीख ठरली

'ही अनोखी गाठ' या चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन महेश वामन मांजरेकर यांचे असून यात श्रेयश तळपदे, गौरी इंगवले, ऋषी सक्सेना, शरद पोंक्षे, सुहास जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट १ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ट्रेलर पाहाता चाहत्यांमध्ये चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

श्रेयस तळपदे आपल्या 'ही अनोखी गाठ'च्या अनुभवाबद्दल बोलतो, "सध्याच्या काळात आपण सगळेच एका निर्मळ प्रेमकथेला मुकले आहोत. प्रेमकथेतील निरागसता हरवत चालली आहे आणि अशावेळी महेश दादांनी मला 'ही अनोखी गाठ'ची गोष्ट ऐकवली. त्या क्षणीच मी ठरवले हा चित्रपट करायचाच. मुळात महेश सर खूप निवडक सिनेमे करतात, त्यातही त्यांचे विषय वेगळे असतात. त्यामुळे या चित्रपटाचा मी भाग होतोय, ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. महेश दादा आणि झी स्टुडिओजसोबत काम करण्याचा अनुभव मस्तच होता. मला खात्री आहे ही अनोखी प्रेमकहाणी प्रेक्षकांनाही आवडेल."

WhatsApp channel