मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Shreyas Talpade: ‘वैद्यकीयदृष्ट्या मी मृतच होतो, पण...’; श्रेयस तळपदेने सांगितलं त्यावेळी नेमकं काय घडलं!

Shreyas Talpade: ‘वैद्यकीयदृष्ट्या मी मृतच होतो, पण...’; श्रेयस तळपदेने सांगितलं त्यावेळी नेमकं काय घडलं!

Jan 03, 2024 02:18 PM IST

Shreyas Talpade Talks About His Heart Attack: श्रेयस तळपदे याने नुकतीच एक मुलाखत दिली आहे. यात त्याने आपण वैद्यकीय दृष्ट्या मृत झालो होतो, असे म्हटले आहे.

Shreyas Talapde Heart Attack
Shreyas Talapde Heart Attack

Shreyas Talpade Talks About His Heart Attack: अभिनेता श्रेयस तळपदे याला काहीच दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी समोर आली होती. हृदयविकाराचा झटका आल्यावर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या बातमीनंतर त्याच्या चाहत्यांनी आणि चित्रपटसृष्टीतील इतर कलाकारांना अभिनेत्याबद्दल काळजी व्यक्त केली होती. मात्र, आता श्रेयस बरा होऊन, पुन्हा कामावर परतला आहे. या दरम्यान श्रेयस तळपदे याने नुकतीच एक मुलाखत दिली आहे. यात त्याने आपण वैद्यकीय दृष्ट्या मृत झालो होतो, असे म्हटले आहे. आपण आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्याऐवजी सगळ्या गोष्टी हलक्यात घेतो, असे त्याने म्हटले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

या घटनेबद्दल बोलताना श्रेयस तळपदे म्हणाला की, ‘माझ्या कुटुंबात हृदयविकाराचा इतिहास आहे. गेली अडीच वर्षे मी न थांबता काम करतो आहे आणि या दरम्यान खूप प्रवास करावा लागला. गेल्या काही महिन्यांपासून मला खूप थकवा जाणवत होता, पण मी सतत काम करत होतो. त्या दिवशी देखील आम्ही ‘वेलकम टू द जंगल’ चित्रपटाचे शूटिंग करत होतो. त्या सीनमध्ये आम्ही सैन्यात प्रशिक्षणादरम्यान जे काही केले जाते, ते करत होतो. शेवटच्या शॉटनंतर अचानक माझ्या डाव्या हातात तीव्र वेदना होऊ लागल्या. काही वेळ चालल्यानंतर मी माझे कपडे बदलले.’

Bigg Boss 17: घरातून बाहेर पडल्यावर निर्णय घेणार! अंकिता लोखंडेने पुन्हा दिले घटस्फोटाचे संकेत

अभिनेता पुढे म्हणाला की, 'आधी मला वाटले की, हे स्नायूंच्या ताणामुळे झाले आहे. कारण आम्ही अॅक्शन सीन दरम्यान खूप ओरडत होतो. गाडीत बसताच थेट हॉस्पिटलला जावं, असं वाटलं. पण, मी आधी घरी गेलो आणि तिथून माझी पत्नी मला डॉक्टरकडे घेऊन जात होती. आम्ही जवळजवळ हॉस्पिटलमध्ये पोहोचलो, पण त्या गेटमधून प्रवेश बंद होता. त्यानंतर आम्हाला पुन्हा यू-टर्न घ्यावा लागला. पुढच्याच क्षणी माझा चेहरा पांढरा पडला होता आणि मी बेशुद्ध झालो. हा हृदयविकाराचा झटका होता.’

श्रेयस तळपदे म्हणाला, 'त्या काही मिनिटांसाठी माझ्या हृदयाची धडधड थांबली होती. आम्ही ट्रॅफिकमध्ये अडकल्यामुळे दीप्ती (पत्नी) बाजूच्या दारातून गाडीतून बाहेर देखील पडू शकली नाही. तिने दुसऱ्या बाजूला मदतीसाठी हाक मारायला सुरुवात केली. काही लोक आमच्या मदतीसाठी पुढे आले आणि मला आत घेऊन गेले. मग, डॉक्टरांनी सीपीआर केले, इलेक्ट्रिक शॉक दिला, अशा प्रकारे मला पुन्हा जिवंत केले. कारण, त्यावेळी वैद्यकीयदृष्ट्या मी मृत होतो. हा एक मोठा तीव्र हृदयविकाराचा झटका होता. माझा जीव वाचवण्यात ज्यांनी मदतीचा हात पुढे केला त्या प्रत्येकाचा मी आभारी आहे.’

टी-२० वर्ल्डकप २०२४