मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Shreyas Talpade: पत्नीनं आयुष्य मिळवून दिलं अन् लेकीनं जीवन सुंदर केलं! वाढदिवशी श्रेयस तळपदे झाला भावूक

Shreyas Talpade: पत्नीनं आयुष्य मिळवून दिलं अन् लेकीनं जीवन सुंदर केलं! वाढदिवशी श्रेयस तळपदे झाला भावूक

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jan 29, 2024 03:29 PM IST

Shreyas Talpade Emotional Post: मृत्यूच्या दाढेतून परतलेल्या श्रेयस तळपदे याच्यासाठी यंदाचा वाढदिवस खूपच खास आहे.

Shreyas Talpade Emotional Post
Shreyas Talpade Emotional Post

Shreyas Talpade Emotional Post: मराठीच नव्हे, तर बॉलिवूड विश्वात आपल्या अभिनयाचा डंका वाजवणारा अभिनेता श्रेयस तळपदे याने नुकताच आपला वाढदिवस साजरा केला. या निमित्ताने त्याने नुकताच त्याचा वाढदिवसाचा एक क्युट व्हिडीओ शेअर करून एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमधून त्याने आपल्या पत्नीचे आभार आणले आहेत. तर, चिमुकल्या लेकीचं कौतुक केलं आहे. हा व्हिडीओ शेअर करताना अभिनेता भावूक झाला होता. या व्हिडीओमध्ये श्रेयस तळपदे याने आपल्या बर्थडे सेलिब्रेशनची झलक दाखवली आहे. श्रेयस तळपदे काहीच दिवसांपूर्वी मृत्यूला हुलकावणी देऊन परतला आहे.

मृत्यूच्या दाढेतून परतलेल्या श्रेयस तळपदे याच्यासाठी यंदाचा वाढदिवस खूपच खास आहे. काहीच दिवसांपूर्वी अभिनेता श्रेयस तळपदे याला हृदयविकाराचा झटका आला होता. या दरम्यान अभिनेत्याची प्रकृती अतिशय गंभीर झाली होती. मात्र, या सगळ्यावर मात करून अभिनेता आपल्या रोजच्या आयुष्यात परतला आहे. आता पुन्हा एकदा श्रेयस तळपदे आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त झाला आहे. या दरम्यान अभिनेत्याने आपला वाढदिवस साजरा केला. या खास दिवशी त्याच्या मुलीने त्याला एक खास सरप्राईज दिलं आहे. याचा व्हिडीओ त्याने आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. यासोबतच त्याने एक पोस्ट देखील लिहिली आहे.

Abhishek Kumar: अजूनही ईशा मालवीयावर प्रेम आहे का? ‘बिग बॉस १७’च्या ग्रँड फिनालेनंतर अभिषेक कुमारने केला खुलासा

आपल्या या पोस्टमध्ये अभिनेता श्रेयस तळपदे याने लिहिले की, ‘हा वाढदिवस खरोखरच खास होता. माझ्या पत्नीने मला आयुष्यभराची भेट दिली ते म्हणजे माझे स्वतःचे आयुष्य... आद्यानेही मला एक खास भेट दिली, जी खरोखरच अमूल्य आहे. तिने तिची खोली सजवली, बोर्डवर शुभेच्छा लिहिल्या. केक आणि कॉन्फेटी आणि फुगे यासह तिला आणखी काय हवे आहे, ते माझ्या पत्नीला सांगितले. स्वतःच्या हाताने तिने एक कार्ड तयार केले. हे खूप मौल्यवान आहे. तिने स्वतः कोऱ्या पानांच्या एका वहीतून हे कार्ड बनवले. यासोबतच तिने दोन पात्र डिझाइन केली (अविना आणि तविना), त्यांच्याभोवती फिरणारी एक कथा लिहिली (तिने स्वतः लिहिलेले हे तिच्या कथेचे पहिले पुस्तक आहे) आणि ते मला भेट म्हणून दिले…. हे सगळं काही माझ्यापासून लपवून तिने केलं. हे सगळंच आश्चर्यकारक आहे. आणखी काय हवे आहे आयुष्यात? देव खरच महान आहे. त्याचे खूप खूप आभार.’

या व्हिडीओमध्ये आपल्या मुलीने आणि पत्नीने दिलेलं सरप्राईज पाहून श्रेयस तळपदे भारावून गेला आहे. या व्हिडीओमध्य तो भावूक होताना देखील दिसला आहे.

WhatsApp channel