'पुष्पा 2: द रूल' हा सिनेमा प्रदर्शित झाला असून अल्लू अर्जनच्या या चित्रपटाला जबरदस्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनसाठी श्रेयस तळपदेने अल्लूच्या पुष्पा राज या व्यक्तिरेखेसाठी आवाज दिला आहे हे तुम्हाला माहित आहे का? मात्र, त्याचे डबिंग झाल्यानंतरही श्रेयस आणि अर्जुन यांची भेट झालेली नाही. दरम्यान, एक किस्सा समोर आला आहे. डबिंग करत असताना श्रेयस तोंडात कापूस ठेवायचा. आता यामागे काय कारण आहे चला जाणून घेऊया...
श्रेयस तळपदेने ईटाइम्सला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तो म्हणाला, पुष्पा राजची व्यक्तिरेखा चित्रपटात एकतर दारू प्यायची किंवा तंबाखूचे सेवन करायची किंवा कधी कधी धूम्रपान करायची आहे. त्यामुळे डबिंग करताना तसा आवाज यावा म्हणून मला तोंडात कापूस ठेवावा लागत होता.
पुढे श्रेयस म्हणाला, 'मी अद्याप अल्लू अर्जुनला भेटलो नाही. आम्ही बोललोही नाही त्यामुळे त्यांच्याकडून आलेल्या अभिप्रायाबद्दल मला कोणतेही अपडेट्स मिळालेले नाहीत.' मागील भागात अर्जुनने पत्रकार परिषदेत डबिंगचं कौतुक केलं होतं. यावेळी अल्लूला कसं वाटलं हे श्रेयसला जाणून घ्यायचं आहे. मात्र, तो अल्लूच्या अपडेटची वाट पाहणार आहे.
याच मुलाखतीदरम्यान श्रेयसने असेही सांगितले की, जेव्हा त्याने या चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली तेव्हा तो खूप नर्व्हस होता आणि त्याच्या पोटात फुलपाखरे उडत होती. पहिल्या भागाकडून फारशी अपेक्षा नव्हती असे तो म्हणाला. काय होणार हे कुणालाच कळत नव्हतं. पण यावेळी त्याला मिळालेल्या भरघोस प्रतिसादामुळे थोडा दबाव आला. मात्र, त्यानंतर त्याने ठरवले की, जाऊन आपले काम करायचे आहे. यावेळी श्रेयसने डबिंगसाठी २ तासांचे १४ वेळा रेकॉर्डिंग केले. जेणे करुन पात्राला योग्य आवाज देता येईल.
वाचा: रवींद्र महाजनींच्या पत्नीच्या मदतीला धावून आले होते बाळासाहेब ठाकरे, वाचा नेमकं काय झालं होतं?
सुकुमार दिग्दर्शित या चित्रपटात अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना आणि फहाद फासिल पुष्पा राज, श्रीवल्ली आणि भंवर सिंग शेकावत यांच्या भूमिकेत दिसत आहेत. या चित्रपटातील मुख्य भूमिकेत असलेल्या अल्लू अर्जुनला पहिल्या भागातील अभिनयासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता. चित्रपटात लाल चंदन तस्करीच्या पार्श्वभूमीवर सत्तासंघर्ष दाखवण्यात आला होता.
संबंधित बातम्या