मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Shreyas Talpade: सई ताम्हणकरसोबत जुळली श्रेयस तळपदेची जोडी! ‘श्रीदेवी प्रसन्न’च्या गाण्यात दिसले एकत्र

Shreyas Talpade: सई ताम्हणकरसोबत जुळली श्रेयस तळपदेची जोडी! ‘श्रीदेवी प्रसन्न’च्या गाण्यात दिसले एकत्र

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jan 20, 2024 11:25 AM IST

Shreyas Talpade And Sai Tamhankar: नव्या चित्रपटाच्या निमित्ताने श्रेयस तळपदे आणि सई ताम्हणकर ही जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळाली आहे.

Shreyas Talpade And Sai Tamhankar
Shreyas Talpade And Sai Tamhankar

Shreyas Talpade And Sai Tamhankar: अभिनेत्री सई ताम्हणकर लवकरच ‘श्रीदेवी प्रसन्न’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात आता प्रेक्षकांना एक खास सरप्राईज मिळणार आहे. सई ताम्हणकर आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘श्रीदेवी प्रसन्न’ या चित्रपटातील एक नवं कोरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या बॉलिवूड स्टाईल गाण्यात अभिनेत्री सई ताम्हणकर आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकर यांच्यासोबत श्रेयस तळपदे देखील झळकणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सई ताम्हणकर आणि श्रेयस तळपदे यांनी तब्बल १६ वर्षांनंतर पुन्हा एकदा स्क्रीन शेअर केली आहे. चाहत्यांनी देखील या गाण्याला चांगला प्रतिसाद दिला आहे.

‘श्रीदेवी प्रसन्न’ या चित्रपटाची कथा नावाप्रमाणेच अतिशय हटके असणार आहे. या चित्रपटात सई ताम्हाणकरसोबत सिद्धार्थ चांदेकर आणि अनेक नावाजलेले कलाकार दिसणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने श्रेयस तळपदे आणि सई ताम्हणकर ही जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळाली आहे. या आधी सई आणि श्रेयस यांनी ‘सनई चौघडे’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटात सई ताम्हणकर, श्रेयस तळपदे, सुबोध भावे यासारखे अनेक चर्चित कलाकार झळकले होते. ‘सनई चौघडे’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन आता जवळपास १६ वर्षे उलटून गेली आहेत. आता ‘श्रीदेवी प्रसन्न’च्या निमित्ताने श्रेयस तळपदे आणि सई ताम्हणकर पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत.

Viral Video: मैत्रिणीच्या लग्नात बेभान होऊन नाचली श्रद्धा कपूर; सोशल मीडियावर व्हायरल होतोय व्हिडीओ

सई ताम्हणकर आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या ‘श्रीदेवी प्रसन्न’ या चित्रपटातील ‘दिल मे बजी गिटार’ हे गाणे नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या चित्रपटातील हे धमाल बॉलिवूड स्टाईल गाणे सई आणि सिद्धार्थवर चित्रित झालं असलं, तरी या गाण्यात श्रेयस तळपदे याची झलक देखील पाहायला मिळाली आहे. या चित्रपटाच्या शेवटच्या भागात दोघांची सिझलिंग केमिस्ट्री पाहायला मिळाली आहे. काही वेळातच या गाण्याला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. प्रेक्षकांनी देखील या गाण्याला पसंती दिली आहे.

सई ताम्हणकर व सिद्धार्थ चांदेकर यांची मुख्य भूमिका असलेला ‘श्रीदेवी प्रसन्न’ हा चित्रपट येत्या २ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री सुलभा आर्या या ‘फिल्मी आज्जी’च्या भूमिकेत झळकणार आहेत. सई आणि सिद्धार्थसोबत या चित्रपटात सिद्धार्थ बोडके, रसिका सुनील, संजय मोने, वंदना सरदेसाई, समीर खांडेकर, आकांक्षा गाडे, रमाकांत डायमा, शुभांगी गोखले, पाहुल पेठे, पल्लवी परांजपे, पूजा वानखेडे, सिद्धार्थ महाशब्दे, जियांश पराडे हे कलाकार देखील महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत.

WhatsApp channel