अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि अभिनेता राजकुमार राव यांचा २०१८मध्ये प्रदर्शित झालेल्या 'स्त्री' या हॉरर कॉमेडी चित्रपटाने अनेकांची मने जिंकली होती. आता या चित्रपटाचा दुसरा भाग 'स्त्री २' हा आज १५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाकडून प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा आहेत. तुम्हीही हा चित्रपट पाहणार असाल तर तिकीट बुक करण्यापूर्वी चित्रपटाचा रिव्ह्यू जरूर वाचा. श्रद्धा कपूर आणि राजकुमारचा हॉरर कॉमेडी चित्रपट तुमचे किती मनोरंजन करणार हे जाणून घेऊया...
'स्त्री २' हा चित्रपट तुम्हाला मनमोकळेपणाने हसायला भाग पाडेल. या चित्रपटाला कॉमेडीची किनार आहे. तसेच कलाकारांच्या कॉमेडीचा अचूक टायमिंग प्रेक्षकांना चित्रपटगृहामध्ये खळखळून हसवत आहे. तसेच चित्रपटातील भूत हे तुम्हाला घाबरवण्यात देखील यशस्वी झाले आहे. जर तुम्ही चित्रपट पाहण्यासाठी जाण्याचा विचार करत असाल तर तुम्ही नक्की जावे कारण प्रेक्षकांना या चित्रपटाकडून ज्या अपेक्षा आहेत त्या सर्व पूर्ण करणारा हा चित्रपट आहे.
जिथं २०१८ सालचे स्त्रीचे वर्ष संपले आहे, तिथूनच स्त्री २ ची सुरुवात होणार आहे. मात्र, यावेळी चंदेरी गावातील नागरिकांची स्त्री पासून तर सुटका झाली आहे पण 'सिरकाटे'ची नवी दहशत निर्माण झाली आहे. गावकरी स्वत:चे रक्षण करण्यासाठी वेगवेगळे उपाय करताना दिसत आहेत. गेल्यावेळी स्त्री ही सर्वांना त्रास देत होती. यावेळी सिरकाटे हे भूत सर्वांना त्रास देत आहे.
यावेळी चंदेरी गावातील महिलांना धोका निर्माण झाला आहे. घरची कामे सोडून इकडे तिकडे कामे करणाऱ्या बायकांना सिरकाटा उचलून घेऊन जातो. तसेच जर गावात तुम्ही फोनचा वापर करत असाल तर सिरकाटा सर्वात आधी तुमच्याकडे येईल अशी अफवा असते. सर्वजण या सिरकटाला घालवण्यासाठी स्त्रीची पुन्हा गावात येण्याची वाट पाहात असतात. आता चंदेरी गावातील लोकांचे रक्षण करण्यासाठी स्त्री पुन्हा येणार का? हे पाहण्यासाठी तुम्हाला चित्रपट पाहावा लागेल.
वाचा: बॉलिवूडच्या 'या' सुपरस्टारला बिग बॉसची ऑफर, एका भागासाठी निर्माते देणार होते ३.५ कोटी
चित्रपटातील संवाद, पटकथा आणि कथा प्रेक्षकांना खूप आवडत आहे. चित्रपटातील विनोद प्रेक्षकांना खळखळून हसवण्यात यशस्वी ठरले आहेत. तसेच चित्रपटातील संवाद हे उत्कृष्ट आहेत. ते प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरताना दिसत आहेत.