Shraddha Kapoor: लता मंगेशकर यांच्याशी खास नातं; आता गणकोकीळेच्या बायोपिकमध्ये झळकणार श्रद्धा कपूर?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Shraddha Kapoor: लता मंगेशकर यांच्याशी खास नातं; आता गणकोकीळेच्या बायोपिकमध्ये झळकणार श्रद्धा कपूर?

Shraddha Kapoor: लता मंगेशकर यांच्याशी खास नातं; आता गणकोकीळेच्या बायोपिकमध्ये झळकणार श्रद्धा कपूर?

Sep 28, 2023 02:15 PM IST

Shraddha Kapoor In Lata Mangeshkar Biopic: अभिनेत्री श्रद्धा कपूर हिचं लता मंगेशकर यांच्या खास नातं देखील आहे.

Shraddha Kapoor In Lata Mangeshkar Biopic
Shraddha Kapoor In Lata Mangeshkar Biopic

Shraddha Kapoor In Lata Mangeshkar Biopic: बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर हिने काहीच दिवसांपूर्वी लता मंगेशकर यांच्या बायोपिकमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. अभिनेत्री श्रद्धा कपूर हिचं लता मंगेशकर यांच्या खास नातं देखील आहे. श्रद्धा कपूर ही नात्याने लता मंगेशकर यांची नात आहे. लता मंगेशकर यांची आज (२८ सप्टेंबर) ९४वी जयंती आहे. सध्या लता मंगेशकर यांच्यावर जर बायोपिक बनवला गेला तर, त्यात कोणती अभिनेत्री काम करणार याची चर्चा सुरू झाल्यानंतर अभिनेत्री श्रद्धा कपूर हिचे नाव समोर आले आहे.

नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान श्रद्धाला प्रश्न विचारण्यात आला की, तिला कोणाच्या बायोपिकमध्ये काम करायला आवडेल? तेव्हा तिने उत्तर दिले की, ‘मला लता मंगेशकर साकारायला आवडतील. हे माझं एक मोठं ध्येय आहे.’ यामागे असलेलं खास कारण म्हणजे श्रद्धा कपूर लता मंगेशकर यांच्याशी नात्याने देखील जवळची आहे. शिवाय तिला गाण्याची आवड असल्यामुळे ती गेल्या अनेक वर्षांपासून लता मंगेशकर यांच्या सतत संवाद साधायची. त्यांचं हे नातं अतिशय जवळचं होतं.

The Vaccine War Review: जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्याशी संघर्ष; कसा आहे ‘द व्हॅक्सिन वॉर’? वाचा...

श्रद्धा कपूरचे आजोबा पंडित पंढरीनाथ कोल्हापुरे हे लता मंगेशकर यांचे चुलत भाऊ आहेत. म्हणजेच श्रद्धाची आई शिवांगी कोल्हापुरे आणि तिची त्यांची बहीण पद्मिनी कोल्हापुरे या नात्याने लतादिदींच्या भाच्या आहेत. लता मंगेशकर यांनी पद्मिनी कोल्हापुरे यांच्यासाठी अनेक अविस्मरणीय गाणी गायली होती. तर, श्रद्धा कपूर देखील लता मंगेशकर यांच्याकडून गाण्याचे धडे गिरवत होती.

अभिनेत्रीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, श्रद्धा तिच्या आगामी हॉरर कॉमेडी चित्रपट 'स्त्री २'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट तिच्या २०१८मध्ये आलेल्या 'स्त्री' या चित्रपटाचा सिक्वेल आहे. या चित्रपटात ती राजकुमार राव, अपारशक्ती खुराना, पंकज त्रिपाठी आणि अभिषेक बॅनर्जी यांच्यासोबत दिसणार आहे.

Whats_app_banner