बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर सतत कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते. कधी तिच्या आगामी चित्रपटांमुळे तर कधी खासगी आयुष्यामुळे. काही दिवसांपूर्वीच तिचा नवा लूक सर्वांसमोर आला होता. आता सध्या सोशल मीडियावर तिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती रिक्षाने प्रवास करताना दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी कौतुक केले आहे.
श्रद्धा कपूर सतत चाहत्यांची मने जिंकत असते. नुकताच तिने मैत्रिणीसोबत रिक्षाने प्रवास केला आहे. फोटोग्राफर्सने तिला कार का घेऊन आली नाही असे विचारले तेव्हा तिने 'ऑटो सर्वात उत्तम आहेत आणि ऑटो सारखे काहीच नाही' असे म्हटले. तिचा हा व्हिडीओ पाहून चाहत्यांनी तिचे कौतुक केले आहे.
एका यूजरने श्रद्धाचा हा व्हिडीओ पाहून ‘तिचा साधेपणाच तिला खूप चांगली व्यक्ती बनवतो’ असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने 'श्रद्धा सारखी दुसरी कोणती अभिनेत्री नाही' असे म्हटले आहे.
श्रद्धाच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तिचा 'तू झूठी मै मक्कार' हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता रणबीर कपूर महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती.
संबंधित बातम्या