बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर सतत कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते. कधी तिच्या आगामी चित्रपटांमुळे तर कधी खासगी आयुष्यामुळे. काही दिवसांपूर्वीच तिचा नवा लूक सर्वांसमोर आला होता. आता सध्या सोशल मीडियावर तिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती फोटोग्राफर्सशी मराठीत बोलताना दिसत आहे.
श्रद्धा कपूर ही तिच्या अभिनयासोबतच वागणूकीने सर्वांची मने जिंकताना दिसते. नुकताच ती वांद्रे येथील एका स्टुडीओ बाहेर दिसली होती. तेथे फोटोग्राफर तिचे फोटो काढताना दिसत होते. तेव्हा श्रद्धाने त्यांना “तुम्ही सगळे कसे आहात?” असा प्रश्न विचारला. त्यावर फोटोग्राफर्सने उत्तर देत “आम्ही छान आहोत. तुम्ही कशा आहात?” त्यावर श्रद्धा म्हणाली, “मी मस्त.”
वाचा: उर्फीने थेट कॅमेरासमोरच बदलले कपडे Video Viral
दरम्यान, श्रद्धाने पिवळ्या रंगाचा टॉप आणि निळ्या रंगाची जीन्स परिधान केली आहे. त्यावर तिने पांढऱ्या रंगाची चप्पल, काळ्या रंगाचा गॉगल घातला आहे. श्रद्धाने केस कापल्यामुळे तिचा लूक थोडा वेगळा वाटत आहे.
श्रद्धाच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तिचा 'तू झूठी मै मक्कार' हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता रणबीर कपूर महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती.
संबंधित बातम्या