Shraddha Kapoor : पोरीने मारली बाजी! श्रद्धा कपूरने ‘या’ बाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही टाकले मागे!
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Shraddha Kapoor : पोरीने मारली बाजी! श्रद्धा कपूरने ‘या’ बाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही टाकले मागे!

Shraddha Kapoor : पोरीने मारली बाजी! श्रद्धा कपूरने ‘या’ बाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही टाकले मागे!

Aug 21, 2024 10:38 AM IST

Shraddha Kapoor : ‘स्त्री २’ अभिनेत्री श्रद्धा कपूरचे ९१.४ मिलियन इंस्टाग्राम फॉलोअर्स आहेत. तर, या प्लॅटफॉर्मवर पंतप्रधान मोदींचे ९१.३ दशलक्ष फॉलोअर्स आहेत.

Shraddha Kapoor: श्रद्धा कपूरने ‘या’ बाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही टाकले मागे!
Shraddha Kapoor: श्रद्धा कपूरने ‘या’ बाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही टाकले मागे!

Shraddha Kapoor Followers: बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचे इन्स्टाग्रामवर ९१.४ दशलक्ष फॉलोअर्स आहेत, जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा जास्त आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक्सवर (पूर्वीट्विटर) सर्वाधिक फॉलोअर्स असलेले जागतिक नेते आहेत आणि त्यांचे १०१.२ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. क्रिकेट स्टार विराट कोहली आणि अभिनेत्री प्रियांका चोप्रा नंतर आता श्रद्धा कपूर मेटा-ओव्हन्ड प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक फॉलो केली जाणारी तिसरी भारतीय सेलिब्रिटी बनली आहे. सध्या श्रद्धा कपूर १५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या हॉरर कॉमेडी 'स्त्री २' या चित्रपटाच्या यशाचा आनंद लुटत आहे.

विराट कोहली आणि प्रियांका चोप्रा अनुक्रमे २७१ दशलक्ष आणि ९१.८ दशलक्ष फॉलोअर्ससह इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलो केले जाणारे भारतीय सेलिब्रिटी आहेत. आलिया भट्टचे या प्लॅटफॉर्मवर ८५.१ मिलियन फॉलोअर्स आहेत, तर दीपिका पदुकोणचे ७९.८ मिलियन फॉलोअर्स आहेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, दुबईचे शासक शेख मोहम्मद आणि पोप फ्रान्सिस यांच्यासारख्या जागतिक नेत्यांपेक्षा पंतप्रधान मोदी खूप पुढे आहेत. पंतप्रधान कार्यालयाच्या (पीएमओ) एक्स अकाऊंटवर ५६ दशलक्षांहून अधिक फॉलोअर्स आहेत. भारतीय नेत्यांमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांचे २६.७ दशलक्ष फॉलोअर्स आहेत, तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे एक्सवर २७.६ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म अब्जाधीश एलन मस्क यांच्या मालकीचा आहे.

Stree 2 Collection: ‘स्त्री २’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; अवघ्या २ दिवसांत ओलांडला १०० कोटींचा टप्पा! पाहा कलेक्शन…

'स्त्री २'ने  गाठला ३०० कोटींचा टप्पा!

राजकुमार रावसोबत श्रद्धा कपूरची मुख्य भूमिका असलेला ‘स्त्री २’ हा चित्रपट बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये जागतिक स्तरावर ३०० कोटींचा टप्पा ओलांडत आहे. हा २०१८ मध्ये आलेल्या 'स्त्री'चित्रपटाचा सिक्वेल आहे. एकाच दिवशी प्रदर्शित झालेल्या 'खेल खेल में' आणि 'वेदा' या चित्रपटांसोबत ब्लॉकबस्टरला बॉक्स ऑफिसवर टक्कर द्यावी लागली. 'स्त्री २' या चित्रपटाचे दिग्दर्शन अमर कौशिक यांनी केले आहे. अभिनेता वरुण धवनचा या चित्रपटात खास कॅमिओ आहे. श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांनी वीकेंडला 'स्त्री २'च्या सक्सेस पार्टीला हजेरी लावली होती.

राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर अभिनीत हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच ट्रेड एक्स्पर्ट गिरीश जोहर यांनी सांगितले होते की, चित्रपटाचा मागील भाग ब्लॉकबस्टर हिट झाला होता आणि कथा अशा वळणावर संपली होती की, प्रेक्षक पुढच्या भागाची आतुरतेने वाट पाहत होते. चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणी चर्चेत जबरदस्त भूमिका बजावताना दिसत आहेत. अशा तऱ्हेने हा चित्रपट सर्वार्थाने गाजणार हे स्पष्टपणे दिसते आहे.

Whats_app_banner