बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर सतत कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते. कधी तिच्या आगामी चित्रपटांमुळे तर कधी खासगी आयुष्यामुळे. काही दिवसांपूर्वीच तिचा नवा लूक सर्वांसमोर आला होता. आता सध्या सोशल मीडियावर तिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती फोटोग्राफर्सशी मराठीत बोलताना दिसत आहे.
श्रद्धा कपूरला मराठी संस्कृतीबद्दल, मराठी भाषेबद्दल नेहमीच गोडी वाटत आली आहे. बोलणं असो, वेशभूषा असो अथवा खाद्यपदार्थ; अनेकदा ती तिच्या कृतीतून तिला मराठी संस्कृतीबद्दल वाटणारं प्रेम दाखवत असते. अनेकदा ती फोटोग्राफर्सशी मराठीत संवाद साधते. आता सोशल मीडियावर श्रद्धाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती मराठीत संवाद साधताना दिसते.
वाचा: त्याने नशेत माझ्यासोबत...; विवेक अग्निहोत्रीवर आरोप करणाऱ्या महिलेच ट्वीट व्हायरल
श्रद्धा कपूर नुकताच वर्सोवा जेटीने मुंबई बाहेर गेली. त्यावेळी तिचे फोटो आणि व्हिडीओ काढण्यासाठी फोटोग्राफर्स तेथे पोहोचले होते. त्यावेळी श्रद्धाने फोटोग्राफर्सशी मराठीत संवाद साधला. व्हिडीओमध्ये ती बोलताना दिसत आहे की, “तुम्हाला असे उलटे चालताना पाहून मला भीती वाटते.” त्यावर फोटोग्राफर म्हणतो की, “आता आम्हाला सवय झाली.” लगेच श्रद्धा म्हणते, “हो मला माहित आहे, पण इथे खडबडीत आहे म्हणून.” त्यानंतर श्रद्धा सगळ्यांना बाय बोलून निघून जाते. श्रद्धाचा फोटोग्राफर्सशी बोलताना साधेपणा पाहून नेटकऱ्यांची मने जिंकली आहेत.
संबंधित बातम्या