बॉलिवूड कलाकार हे त्यांच्या लग्झरी लाइफसाठी विशेष ओळखले जातात. त्यांची आलिशान घरे, गाड्या हे चाहत्यांसाठी आकर्षण ठरते. तसेच कलाकारांची घरे पाहण्यासाठी देखील चाहते आतुर असतात. नुकताच अभिनेत्री श्रद्धा कपूरने मुंबईत भाडे तत्त्वावर घर घेतले आहे. तिने जुहू परिसरात हे घर घेतले आहे. पण चाहत्यांना प्रश्न पडला आहे की श्रद्धा स्वत:चे घर सोडून भाड्याच्या घरात राहायला का गेली? आता श्रद्धा कपूरच्या या नव्या घराचे भाडे किती असा प्रश्न देखील अनेकांना पडला आहे. चला जाणून घेऊया...
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या स्त्री २ हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरल्यानंतर अभिनेत्री श्रद्धा कपूरने मुंबईतील जुहू भागात दरमहा ६ लाख रुपये भाडे असलेला लग्झरी फ्लॅट भाडे तत्त्वार घेतला आहे. हा फ्लॅट ३९२८.८६ चौरस फुटांचा आहे. अभिनेत्रीने हा फ्लॅट वर्षभरासाठी घेतला असून ७२ लाख रुपये आगाऊ भाडे दिले आहे. १६ ऑक्टोबर रोजी नोंदणी केलेल्या रजा आणि परवाना दस्तऐवजानुसार या घरासाठी चार कार पार्किंग देण्यात आले आहे. या फ्लॅटसाठी श्रद्धाने ३६ हजार रुपये मुद्रांक शुल्क आणि एक हजार रुपये नोंदणी शुल्क भरले आहे.
श्रद्धा ही शक्ती कपूर आणि शिवांगी कोल्हापुरे यांची मुलगी. तीन पत्ती या चित्रपटातून तिने पदार्पण केले. तिचा शेवटचा सिनेमा हा स्त्री २ आहे. या चित्रपटात श्रद्धासोबत राजकुमार राव महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. आता श्रद्धाचा आगामी सिनेमा वरुण धवनसोबत आहे. या सिनेमाची अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही.
अनेक बॉलिवूड कलाकार हे स्वत:च्या मालकीचे घर असून सु्द्धा भाडे तत्त्वार राहतात. त्यामागील कारण म्हणजे एखाद्या विशिष्ट ठिकाणी कलाकारांना राहायची इच्छा असते. मात्र, तेथे घर विक्रिसाठी नसल्यामुळे ते भाड्याच्या घरात राहतात. जसे की समुद्रकिनाऱ्या जवळील घरे. कधी कधी कलाकारांना नवे घर विकित घेणे परवडण्यासारखे नसते. त्यामुळे देखील त्यांना भाड्याच्या घरात रहावे लागते.
वाचा: प्रियकरासोबतचा वाद कोर्टापर्यंत गेला, आकस्मिक मृत्यू झाला! पद्मा चव्हाण यांच्यासोबत नेमकं काय घडलं होतं?
यापूर्वी 'झॅपकी'ने दिलेल्या वृत्तानुसार, बॉलिवूड चित्रपट पटकथालेखक, दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरने मुंबईतील पाली हिल भागात तीन वर्षांसाठी दरमहा आठ लाख रुपये भाड्याने एक मालमत्ता घेतली होती. इम्रान खानने करण जोहरकडून वांद्रे येथील कार्टर रोडवरील क्लेफेपेट येथील तीन मजली फ्लॅट भाड्याने घेतला होता. २० मार्च २०२४ रोजी या कराराची नोंदणी करण्यात आली असून या करारावर २७ लाख रुपयांची सिक्युरिटी डिपॉझिट ठेवण्यात आली आहे.
संबंधित बातम्या