Shraddha Kapoor Love Life: बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर तिच्या सौंदर्यामुळे आणि अभिनयामुळे नेहमीच चर्चेत असते. मात्र, आता अभिनेत्री श्रद्धा कपूर ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. ‘तू झुठी मैं मक्कार’चे लेखक राहुल मोदी यांच्यासोबत श्रद्धा नुकतीच चित्रपट पाहण्यासाठी गेली होती. ज्यानंतर सोशल मिडीयावर त्यांच्या अफेयरच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. नेटिझन्स असा अंदाज लावत आहेत की, अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या आयुष्यात पुन्हा एकदा प्रेम आले आहे. राहुल मोदी आणि श्रद्धा कपूर एकमेकांना डेट करत आहेत, असा कयास चाहत्यांनी बांधला आहे.
अभिनेत्री श्रद्धा कपूर नुकतीच राहुल मोदींसोबत चित्रपट पाहण्यासाठी आली होती. यावेळी दोघेही पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद झाले होते. अभिनेत्री श्रद्धा कपूरचा चित्रपट लेखक राहुल मोदीसोबतचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर, लोकांनी असा अंदाज बांधला आहे की, श्रद्धा कपूरच्या आयुष्यात पुन्हा एकदा एका खास व्यक्तीसोबत प्रेमाची एन्ट्री झाली आहे.
रिपोर्ट्सनुसार, श्रद्धा कपूर याआधी सेलिब्रिटी फोटोग्राफर रोहन श्रेष्ठसोबत सुमारे चार वर्षे रिलेशनशिपमध्ये होती. त्यानंतर २०२२मध्ये अभिनेत्री रोहनपासून विभक्त झाल्याची बातमी समोर आली होती.
राहुल मोदी हे श्रद्धा कपूरच्या नुकत्याच रिलीज झालेल्या ‘तू झुठी मैं मक्कार’ या चित्रपटाचे लेखक आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन लव रंजन यांनी केले आहे. राहुल मोदी आणि श्रद्धा कपूर यांनी कोणत्याही प्रकारे त्यांचे नाते अधिकृत केले नाही. मात्र, राहुल अनेकदा श्रद्धा कपूरच्या कुत्र्यासोबतचे फोटो शेअर करत असतात. राहुल आणि श्रद्धाच्या या वाढत्या जवळीकीने चाहत्यांच्या अपेक्षा खूप वाढल्या आहेत. श्रद्धा कपूर सध्या तिच्या आगामी चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. अभिनेत्रीने नुकतेच राजकुमार रावसोबत ‘स्त्री २’चे शूटिंग सुरू केले आहे.
संबंधित बातम्या