Shraddha Kapoor In Love: सध्या बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर तिचा नुकत्याच प्रदर्शित झालेल्या हॉरर-कॉमेडी चित्रपट 'स्त्री २'च्या यशाचा आनंद घेत आहे. या चित्रपटातील श्रद्धा आणि राजकुमार राव यांच्या जबरदस्त अभिनयाने सर्वांची मने जिंकली आहेत. बॉक्स ऑफिस कमाईच्या बाबतीत या चित्रपटाने अनेक मोठ्या चित्रपटांचे रेकॉर्ड तोडले आहेत. प्रोफेशनल लाईफसोबतच श्रद्धा कपूर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही खूप चर्चेत असते. आता शक्ती कपूरची लाडकी श्रद्धा हिने तिच्या नात्याची कबुली दिली आहे. ही बातमी समोर येताच श्रद्धाचे चाहते खूपच खूश होता दिसत आहेत.
श्रद्धा कपूरने नुकतीच कॉस्मोपॉलिटनला मुलाखत दिली. यावेळी जेव्हा अभिनेत्रीला तिच्या नात्याबद्दल विचारण्यात आले, तेव्हा तिने अजिबात न लपवाछपवी करता अतिशय खुलेपणाने उत्तर दिले. तिने कोणाचेही नाव घेतले नाही. मात्र, श्रद्धा म्हणाली की, 'मला माझ्या जोडीदारासोबत वेळ घालवायला आणि सिनेमा बघायला, बाहेर जेवायला किंवा प्रवास करायला आवडते. मी एक सामान्य व्यक्ती आहे, जिला एकत्र काहीतरी करायला आवडते किंवा एकत्र फिरायला आवडते.’
यानंतर, याच मुलाखतीत जेव्हा श्रद्धाला तिचा लग्ना संस्थेवर किती विश्वास आहे, याबद्दल प्रश्न विचारण्यात आले तेव्हा ती म्हणाली, 'लग्नावर विश्वास ठेवण्याबद्दल काहीच दुमत नाही. पण योग्य जोडीदार आणि योग्य व्यक्तीसोबत असणं महत्त्वाचं आहे. कोणाला लग्न करायचे असेल तर चांगली गोष्ट आहे, पण त्याला कधीच लग्न करायचे नसेल तर तेही तितकेच योग्य आहे.’
गेल्या वर्षी श्रद्धा कपूरचे नाव लेखक राहुल मोदीसोबत जोडले जात होते. दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याचे वृत्त चर्चेत होते. दोघेही अनेकदा एकत्र स्पॉट झाले होते. मात्र, दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल कधीच उघडपणे खुलासा केला नाही. यानंतर त्यांच्या ब्रेकअपची बातमी तेव्हा चर्चेत आली, जेव्हा श्रद्धा कपूरने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून राहुल मोदीला अनफॉलो केले. श्रद्धा कपूरची चुलत बहीण जानाई भोसले हिनेही राहुलला अनफॉलो केले आहे, ज्यामुळे दोघांचे ब्रेकअप झाल्याचे स्पष्ट होते. श्रद्धा किंवा राहुल या दोघांनीही यावर कोणतेही वक्तव्य दिलेले नाही, परंतु ते त्यांच्या नात्याच्या अफवांमुळे काही काळ चर्चेत राहिले.
'स्त्री २' फेम अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या तिच्या चित्रपटांच्या यशाचा आनंद घेत आहे. श्रद्धा कपूर सोशल मीडियावर सर्वाधिक सक्रिय असते. ती नेहमीच तिच्या चाहत्यांशी कनेक्टेड राहते. इतकंच नाही तर, श्रद्धा तिच्या चाहत्यांच्या कमेंटलाही उत्तर देत असते.
संबंधित बातम्या