मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Shraddha Kapoor Birthday: कधीकाळी कॉफी विकणाऱ्या श्रद्धा कपूरने सलमान खानसोबत काम करण्यास दिलेला नकार!

Shraddha Kapoor Birthday: कधीकाळी कॉफी विकणाऱ्या श्रद्धा कपूरने सलमान खानसोबत काम करण्यास दिलेला नकार!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Mar 03, 2024 07:37 AM IST

Shraddha Kapoor Birthday Special: श्रद्धा कपूर हिला वयाच्या अवघ्या १६व्या वर्षी पहिल्या चित्रपटाची ऑफर आली होती. श्रद्धाला ऑफर झालेला हा चित्रपट सलमान खानचा होता.

Shraddha Kapoor Birthday
Shraddha Kapoor Birthday

Shraddha Kapoor Birthday Special: बॉलिवूडची सरळ, साधी आणि गोंडस अभिनेत्री अर्थात ‘आशिकी गर्ल’ श्रद्धा कपूर हिचा आज (३ मार्च) वाढदिवस आहे. श्रद्धा कपूर हिचा जन्म ३ मार्च १९८७ रोजी मुंबईत झाला. अभिनेत्री श्रद्धा कपूरने आपली ओळख केवळ अभिनयापुरती मर्यादित ठेवलेली नाही. बॉलिवूडमधील टॉप खलनायकांपैकी एक असलेल्या अभिनेता शक्ती कपूरची ही लाडकी लेक एक उत्कृष्ट गायिका देखील आहे. श्रद्धा कपूर हिचे सुरुवातीचे शिक्षण मुंबईच्या जमनाबाई नरसी स्कूलमधून झाले. अभिनेता टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूर हे या शाळेत एकाच वर्गात शिकत होते. यामुळे मनोरंजन विश्वाबाहेर देखील ते दोघे खूप चांगले मित्र आहेत. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर श्रद्धा अमेरिकेत निघून गेली. पदवी शिक्षणासाठी तिने बोस्टन विद्यापीठात प्रवेश घेतला. मात्र, काही काळानंतर ती ने अभिनयाच्या ओढीमुळे अभ्यास सोडून पुन्हा मुंबईकडे धाव घेतली.

कॉफी शॉपमध्ये काम करायची श्रद्धा!

अभिनेत्री होण्यापूर्वी श्रद्धा कपूरने एका कॉफी शॉपमध्येही काम केले होते. याचा खुलासा खुद्द श्रद्धा कपूरने एका मुलाखतीत केला होता. एका मुलाखतीत बोलताना तिने सांगितलेले की, जेव्हा ती बोस्टन युनिव्हर्सिटीमध्ये शिकत होती, तेव्हा पॉकेटमनी कमवण्यासाठी ती एका कॉफी शॉपमध्ये काम करायची.

Devoleena Bhattacharjee Post: ‘गोपी बहु’ देवोलीना भट्टाचार्जीने मागितली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदत!

सलमान खानच्या चित्रपटाला दिला नकार

अभिनेत्री श्रद्धा कपूर हिला वयाच्या अवघ्या १६व्या वर्षी पहिल्या चित्रपटाची ऑफर आली होती. श्रद्धाला ऑफर झालेला हा चित्रपट सलमान खानचा होता. मात्र, श्रद्धा कपूरने या चित्रपटाला थेट नकार दिला होता. तिने हा चित्रपट का नाकारला, याचे कारण समोर आले नसले तरी, काही काळानंतर तिने ‘तीन पत्ती’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. यानंतर 'लव्ह का द एंड' या चित्रपटातही तिने महत्त्वाची भूमिका साकारली होती. मात्र, तिचे हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकले नाहीत.

'आशिकी २'मुळे झाली रातोरात फेमस!

सलग दोन फ्लॉपनंतर श्रद्धा कपूरचे करिअर धोक्यात आले होते. त्यावेळी महेश भट्ट यांनी ‘आशिकी २’मध्ये श्रद्धाला संधी दिली. तिचा हा चित्रपट ब्लॉकबस्टर हिट ठरला. या चित्रपटानंतर श्रद्धा रातोरात स्टार झाली. यानंतर तिने ‘एक व्हिलन’, ‘हैदर’, ‘एबीसीडी २’, ‘बागी’, ‘स्त्री’ आणि ‘छिछोरे’ यासह अनेक चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत.

IPL_Entry_Point