अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री श्रद्धा कपूरचा हॉरर कॉमेडी चित्रपट 'स्त्री 2' सध्या खूप चर्चेत आहे. १५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दबदबा निर्माण केला आहे. अमर कौशिक दिग्दर्शित 'स्त्री २' या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बंपर कमाई केली. त्याने अनेक हिट चित्रपटांचे विक्रम मोडले आहेत. आज 'स्त्री २' प्रदर्शित होऊन अर्धा महिना झाला आहे. तरीही चित्रपटाच्या कमाईत घट झालेली दिसत नाही. आता १६व्या दिवशी चित्रपटाने किती कमाई केली चला जाणून घेऊया...
राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर च्या जोडीने पुन्हा एकदा 'स्त्री २'मध्ये धुमाकूळ घातला आहे. पहिल्या भागानंतर आता त्याचा दुसरा भाग म्हणजेच 'स्त्री २' देखील प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करत आहे. 'स्त्री २' देखील दररोज भरपूर कमाई करत आहे. मात्र जॉन अब्राहमचा 'वेद' आणि अक्षय कुमारचा 'खेल खेल में' हे चित्रपट 'स्त्री २'च्या वादळापुढे स्वत:ला वाचवू शकले नाहीत.
'स्त्री २'ने पहिल्याच दिवशी ५१.८ कोटींची कमाई केली. त्याच्या ओपनिंग डे कलेक्शनने कमाईच्या बाबतीत अनेक चित्रपटांना मागे टाकले. अशातच आता शुक्रवारी चित्रपटाची सुरुवातीची आकडेवारी समोर आली आहे. सॅनिल्कच्या सुरुवातीच्या रिपोर्टनुसार, 'स्त्री २'ने १६ व्या दिवशी २.६१ कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटाच्या एकूण कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर आतापर्यंत या चित्रपटाने ४३५.६६ कोटी रुपयांची कमाई केली आहे. शेवटच्या दिवसापर्यंत त्याची कमाई आणखी चांगली होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
वाचा : ‘तारक मेहता . . .’ मालिकेतील अभिनेत्रीचा संसार मोडला; लग्नाच्या ७ वर्षांनंतर पतीपासून विभक्त होणार!
१ दिवस - ५१.८ कोटी
२ दिवस - ३१.४ कोटी
३ दिवस - ४३.८५ कोटी
४ दिवस - ५५.९ कोटी
५ दिवस - ३८.१ कोटी
६ दिवस - २५.८ कोटी
७ दिवस - १९ कोटी
८ दिवस - १६.८ कोटी
९ दिवस - १७.५ कोटी
१० दिवस - ३३ कोटी
११ दिवस - ४२.४ कोटी
१२ दिवस - १८.५ कोटी
१३ दिवस - ११.७५ कोटी
१४ दिवस - ९.७५ कोटी
१५ दिवस- २.६१ कोटी