Shivrayancha Chhava: ‘शिवरायांचा छावा’ चित्रपटात ‘हा’ अभिनेता साकारतोय छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका!
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Shivrayancha Chhava: ‘शिवरायांचा छावा’ चित्रपटात ‘हा’ अभिनेता साकारतोय छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका!

Shivrayancha Chhava: ‘शिवरायांचा छावा’ चित्रपटात ‘हा’ अभिनेता साकारतोय छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका!

Jan 04, 2024 01:52 PM IST

Shivrayancha Chhava Teaser Released: ‘शिवरायांचा छावा’ या आगामी मराठी चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Shivrayancha Chhava Teaser
Shivrayancha Chhava Teaser

Shivrayancha Chhava Teaser Released: छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य इतिहास मोठ्या पडद्यावर दाखवणाऱ्या दिग्दर्शक-निर्माता दिग्पाल लांजेकर यांनी आता स्वराज्याचे धाकले धनी अर्थात छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास देखील पडद्यावर दाखवणार आहे. दिग्पाल लांजेकर यांच्या ‘शिवरायांचा छावा’ या आगामी मराठी चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या टीझरमधून या चित्रपटात छत्रपती संभाजी महराज साकारणाऱ्या अभिनेत्याची झलक देखील प्रेक्षकांना पाहायला मिळाली आहे.

‘कोण शत्रू यावरी करील कैसा कावा, वाघालाही फाडतो हा "शिवरायांचा छावा". छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत अभिनेता भूषण पाटील’, असे कॅप्शन देऊन ‘शिवरायांचा छावा’ या चित्रपटाचा टीझर शेअर करण्यात आला आहे. या दमदार टीझरमध्ये छत्रपती संभाजी महाराज वाघाशी लढताना दिसले आहेत. वाघाच्या जबड्यात हात घालून त्याचे दात मोजणारे छत्रपती संभाजी महाराज या टीझरमध्ये पाहायला मिळाले आहेत. अभिनेता भूषण पाटील याने या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारण्याचं शिवधनुष्य पेललं आहे. या टीझरवर आता चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत. प्रेक्षक देखील हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत.

Amala Paul: लग्नाच्या दोन महिन्यांतच अजय देवगणच्या अभिनेत्रीने दिली ‘गुडन्यूज’! फोटो शेअर करत म्हणाली...

काहीच दिवसांपूर्वी या चित्रपटाचं जबरदस्त पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. तेजस्वी, धाडसी, शस्त्रशास्त्र पारंगत शंभूराजांची भूमिका रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. 'शिवरायांचा छावा' चित्रपटाच्या लक्षवेधी टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची वाढली आहे. इतिहासाच्या पानांवर सुवर्णाक्षरांत कोरलं गेलेलं स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचे अवघे आयुष्य एक धगधगते अग्निकुंडच आहे. मोठ्या पडद्यावर संभाजी महाराजांचा जीवनपट उलगडण्याचे शिवधनुष्य दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी उचलले आहे.

'शिवरायांचा छावा' नववर्षात म्हणजेच १६ फेब्रुवारी २०२४ ला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. संभाजी महाराजांच्या धगधगत्या अजेय पराक्रमाची कथा दिग्पाल लांजेकरांनी लिहिली असून, पटकथा-संवाद आणि गाणी देखील त्यांचीच आहेत. या गाण्यांना साजेसे संगीत युवा संगीतकार देवदत्त मनीषा बाजी यांनी दिले आहे. तर, पार्श्वसंगीत अमर मोहिले यांचे आहे.

Whats_app_banner