Shivani Surve: शिवानी सुर्वेचा कधी न पाहिलेला अवतार, 'आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे'चा टीझर प्रदर्शित-shivani surve upcoming movie operation london cafe teaser is out ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Shivani Surve: शिवानी सुर्वेचा कधी न पाहिलेला अवतार, 'आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे'चा टीझर प्रदर्शित

Shivani Surve: शिवानी सुर्वेचा कधी न पाहिलेला अवतार, 'आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे'चा टीझर प्रदर्शित

Aarti Vilas Borade HT Marathi
Aug 21, 2024 06:25 PM IST

Shivani Surve upcoming movie: अभिनेत्री शिवानी सुर्वे ही 'आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे' या चित्रपटाच दिसणार आहे. या चित्रपटाचा टीझर सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

operation london cafe
operation london cafe

Operation london cafe Teaser: मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री म्हणून शिवानी सुर्वे ओळखली जाते. तिने अभिनय आणि सौंदर्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. देवयानी मालिकेमुळे महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री शिवानी सुर्वे नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ती 'आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे' या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. तिच्या या चित्रपटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. अशातच आता चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे.

काही महिन्यांपूर्वी 'आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे' या मराठी सिनेमाच्या पोस्टरने चाहत्यांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण केली होती. या सिनेमाचा लूक पाहून मराठी प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय बनला होता की हा सिनेमा कधी प्रदर्शित होणार? आता या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून शिवानीचा लूक समोर आला आहे.

काय आहे टीझर?

'आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे' या बहुप्रतीक्षित सिनेमाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून त्यात दाखवलेल्या सीन्सनी, कलाकारांच्या अभिनयाच्या झलकनी, थरारक ऍक्शन सिक्वेन्सेसनी आणि प्रभावी बॅकग्राऊंड म्युझिकमुळे प्रेक्षकांच्या अपेक्षा आणखी उंचावल्या आहेत. हा सिनेमा काहीतरी वेगळा आणि अधिक रोमांचक दिसतोय. मराठी सिनेसृष्टीने आजवर विविध विषय सखोल विचार करून हाताळले आहेत, मात्र हा सिनेमा एका नव्या दृष्टिकोनातून आणि वेगळ्या शैलीतून सादर करण्यात आलेला आहे.

सहा भाषांमध्ये प्रदर्शित होणार चित्रपट

‘आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे’ या सिनेमाचे निर्माते दिपक पांडुरंग राणे हे विविध जॉनरमधील सिनेमांची निर्मिती करत प्रेक्षकांना खास अनुभव देण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांचा नेहमीच असा उद्देश असतो की प्रेक्षकांनी अडीच ते तीन तास सिनेमागृहात येऊन स्वतःसाठी वेळ काढावा, रिलॅक्स व्हावे आणि मनोरंजनाचा आनंद घ्यावा. त्यामुळे त्यांनी नेहमीच अशा सिनेमांची निवड केली आहे, जे प्रेक्षकांना आवडतील. आता त्यांनी एक नवं पाऊल पुढे टाकत एक नवीन विषय हाताळला आहे. या वेळी त्यांनी मराठी सिनेसृष्टीसाठी एक असा सिनेमा तयार केला आहे, जो कन्नडा सिनेमासोबत कोलॅबोरेट करून बनवला गेला आहे. हा सिनेमा कन्नडा, मराठी, हिंदी, तेलुगु, तामिळ आणि मल्याळम या ६ भाषांमध्ये पॅन इंडिया रिलीज होणार आहे.
वाचा: सैफ अली खानवर दिल्लीतील नाइट क्लबमध्ये झाला होता हल्ला, कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

कोणते कलाकार दिसणार?

'आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे’ या सिनेमात मराठीतील दिग्गज आणि लोकप्रिय कलाकार शिवानी सुर्वे, विराट मडके, प्रसाद खांडेकर, अश्विनी चावरे, शलाका पवार यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. याचबरोबर, साऊथ इंडस्ट्रीतील सुपरस्टार कवीश शेट्टी आणि लोकप्रिय अभिनेत्री मेघा शेट्टी देखील प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. मराठी आणि साऊथ इंडस्ट्रीतील प्रतिभावंत कलाकार एकाच सिनेमात एकत्र येऊन ज्या ताकदीने हे पात्र साकारणार आहेत, ते प्रेक्षकांसाठी एक परिपूर्ण मनोरंजनाचा खजिना ठरणार आहे.