Shivani Surve And Ajinkya Nanaware Marriage: मराठी मालिका चित्रपटांमधून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणारी सौंदर्यवान अभिनेत्री शिवानी सुर्वे आता लग्नबंधनात अडकली आहे. नुकताच तिचा शाही लग्न सोहळा पार पडला आहे. या लग्न सोहळ्याचा एक व्हिडीओ नुकताच समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांच्या आलिशान लग्न सोहळ्याची झलक पाहायला मिळाली आहे. अभिनेत्री शिवानी सुर्वे ही अभिनेता अजिंक्य ननावरे याच्यासोबत लग्न बंधनात अडकली आहे. नुकतीच दोघांची सप्तपदी पार पडली आहे. आता चाहते या जोडीवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. दोघांच्या लग्न सोहळ्याचा हा खास व्हिडीओ 'राजश्री मराठी'ने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
अभिनेता अजिंक्य ननावरे हा सध्या छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेत मुख्य भूमिकेत झळकत आहे. या मालिकेतील अजिंक्य ननावरे याने साकारलेल्या 'अद्वैत' या भूमिकेला प्रेक्षकांकडून चांगलीच पसंती मिळत आहे. अभिनेता अजिंक्य ननावरे आणि अभिनेत्री शिवानी सुर्वे यांची पहिली भेट 'तू जीवाला गुंतवावे' या लोकप्रिय मालिकेच्या सेटवर झाली होती. या दरम्यान त्यांच्यात छान मैत्री झाली आणि हळूहळू ते एकमेकांच्या प्रेमात पडले. आता त्यांनी एकमेकांशी लग्नगाठ बांधली आहे.
नुकतेच शिवानी सुर्वे हिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर आपल्या साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये दोघेही खूप सुंदर दिसत आहेत. गुलाबी रंगाच्या साडीमध्ये शिवानी सुर्वे खूपच सुंदर दिसत आहे. तर, अजिंक्य ननावरे देखील मॅचिंग आउटफिटमध्ये राजबिंडा दिसत आहे. आता ही जोडी लग्न बंधनात देखील अडकली आहे. त्यांच्या या शाही लग्नसोहळ्याला मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. ठाण्यातील ‘येऊर हिल्स’ या ठिकाणी शिवानी सुर्वे आणि अजिंक्य ननावरे यांचा विवाहसोहळा पार पडला आहे. त्यांच्या या लग्न सोहळ्यासाठी खास शाही थाटमादेखील पाहायला मिळत आहे.
अजिंक्य ननावरे आणि शिवानी सुर्वे हि जोडी गेल्या नऊ वर्षापासून एकमेकांना डेट करत आहे. मालिकेच्या सेटवर सहकलाकार म्हणून वावरताना दोघे एकमेकांचे चांगले मित्र बनले. त्यांच्या या मैत्रीच्या नात्यात हळूहळू प्रेम फुलू लागले होते. २०१५पासून शिवानी आणि अद्वैत दोघेही एकमेकांना डेट करत आहेत. या सगळ्या प्रवासात त्यांनी नेहमीच एकमेकांची भक्कम साथ दिली. आता दोघेही आयुष्यभराचा प्रवास एकत्र करण्यासाठी सज्ज झाले आहेत. चाहते आणि कलाकार या जोडीवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.