Shivani Surve Engagement: शिवानी सुर्वेने गुपचूप उरकला साखरपुडा, फोटो शेअर करत दिली गूडन्यूज-shivani surve ajinkya nanaware engagement photos are here ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Shivani Surve Engagement: शिवानी सुर्वेने गुपचूप उरकला साखरपुडा, फोटो शेअर करत दिली गूडन्यूज

Shivani Surve Engagement: शिवानी सुर्वेने गुपचूप उरकला साखरपुडा, फोटो शेअर करत दिली गूडन्यूज

Aarti Vilas Borade HT Marathi
Feb 01, 2024 08:06 AM IST

Shivani Surve Engagement Photos: अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अभिनेता अजिंक्य ननावरे यांनी गुपचूप साखरपुडा उरकला आहे. त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Shivani Surve Engagement
Shivani Surve Engagement

Shivani Surve Ajinkya Nanaware Engagement : मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय आणि कायम चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे शिवानी सुर्वे. काही दिवसांपूर्वी तिचा 'झिम्मा २' हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटातील तिचे पात्र प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरले. आता शिवानी एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आहे. तिने सोशल मीडियावर फोटो शेअर करत साखरपुडा झाल्याची माहिती दिली आहे.

शिवानी सुर्वेने अभिनेता अजिंक्य ननावरेशी गुपचूप साखरपुडा केला आहे. साखरपुड्याचे फोटो शेअर करत तिने चाहत्यांना गूडन्यूज दिली आहे. या फोटोंमध्ये शिवानीने जांभळ्या रंगाची वेस्टर्न साडी नेसली आहे. त्यावर ज्वेलरी, हातात हिरवा चुडा घातला आहे. या लूकमध्ये शिवानी अतिशय सुंदर दिसत आहे. दुसरीकडे अजिंक्यने पांढऱ्या रंगाचा कुर्ता घातला असून, त्यावर जांभळ्या रंगाचे जॅकेट घातले आहे. तसेच डोक्यावर टोपी दिसत आहे. या लूकमध्ये अजिंक्य देखील हँडसम दिसत आहे. शिवानी आणि अजिंक्य एकमेकांसोबत अतिशय आनंदी दिसत आहेत.
वाचा: जगभरात 'फायटर'ची हवा! करणार २५० कोटी रुपयांचा पल्ला पार

सोशल मीडियावर शेअर केले फोटो

शिवानीने साखरपुड्याचे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत तिने 'अखेर बंधनात' असे कॅप्शन दिले आहे. त्यांच्या या फोटोंवर चाहत्यांसोबतच कलाकारांनी देखील शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. शिवानीच्या साखरपुड्यातील हे फोटो चाहत्यांसाठी सुखद धक्काच आहे.

शिवानी-अजिंक्यची लव्हस्टोरी

शिवानी ही गेल्या काही दिवसांपासून ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ फेम अभिनेता अजिंक्य ननावरेला डेट करत आहे. त्यांची पहिली भेट ‘तू जीवाला गुंतवावे’ या मालिकेच्या सेटवर झाली होती. पुढे दोघांच्या मैत्रीचे रुपांत प्रेमात झाले. २०१७ पासून शिवानी-अजिंक्य एकत्र असून आता त्यांचा साखरपुडा झाला आहे. शिवानी आणि अजिंक्यच्या लग्नाला सुरुवातीला दोघांच्याही घरच्यांचा विरोध होता. पण आता कुटुंबीयांनी परवानगी दिली असून लवकरच ते लग्न करणार आहेत.

कोण आहे अजिंक्य?

अजिंक्य हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय चेहरा आहे. सध्या 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेच्या माध्यमातून तो प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. मालिका आणि सिनेमांतही त्याने आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे.

Whats_app_banner