मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Star Pravah New Serial: ‘कुन्या राजाची गं तू रानी’ घेणार प्रेक्षकांचा निरोप, 'ही' नवी मालिका होणार सुरु

Star Pravah New Serial: ‘कुन्या राजाची गं तू रानी’ घेणार प्रेक्षकांचा निरोप, 'ही' नवी मालिका होणार सुरु

Aarti Vilas Borade HT Marathi
Feb 17, 2024 02:32 PM IST

Shivani Bavkar Upcoming Serial: शिवानी बावकर या नव्या मालिकेतून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Shivani Bavkar Upcoming Serial
Shivani Bavkar Upcoming Serial

New Serial: छोट्या पडद्यावरील मालिका हे अनेक प्रेक्षकांचे घरबसल्या आणि रोजच्या रोज मनोरंजन करण्याचे माध्यम आहे. अनेक वेगवेगळ्या विषयांवर आधारित मालिका प्रेक्षकांना घरल बसल्या पाहाता येताता. मग त्यामध्ये काही देव-धर्माचे विषय असतील, काही यशस्वी महिला असतील, काही कॉमेडी असतील. प्रेक्षकांचा मालिकांना मिळाणार प्रतिसाद हे निर्मात्यांचे यश असते. आता अभिनेत्री शिवानी बावकरची नवी मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेय

अभिनेत्री शिवानी बावकर व अभिनेता आकाश नलावडे यांची प्रमुख भूमिका असलेली ‘साधी माणसं’ या मालिकेची घोषणा काही दिवसांपूर्वीच झाली. त्यामुळे आता ही नवी मालिका कोणत्या वेळेत भेटीस येणार? आणि कोणती जुनी मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार? किंवा कोणत्या नव्या वेळेत सुरू होणार, याकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले होते. आता प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ‘मराठी टीव्ही इन्फो’ या इन्स्टाग्राम पेजवर ‘साधी माणसं’ या नव्या मालिकेची वेळ जाहीर करण्यात आली आहे. चाहत्यांसाठी हा सुखद धक्काच आहे.
वाचा: शाहरुख खानच्या गाण्यावर 'दगडू'चा भन्नाट डान्स, साखरपुड्यातील व्हिडीओची चर्चा

१८ मार्च पासून ‘साधी माणसं’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही मालिका संध्याकाळी ७ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वेळात सुरु असलेली ‘कुन्या राजाची गं तू रानी’ ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे म्हटले जात आहे. पण ही मालिका बंद होणार की नव्या वेळात प्रेक्षकांच्या भेटीला येणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

काय आहे नव्या मालिकेची कथा?

‘साधी माणसं’ या मालिकेत मीरा या फुलविक्रेतीची कथा आहे. तर दुसरीकडे सत्या कामधंदे नसणारा दारुच्या आहारी गेलेला तरुण दाखवण्यात आला आहे. शिवानी ही मीराची भूमिका साकारताना दिसणार आहे. तर आकाश ही सत्या ही भूमिका साकारणार आहे. आता एकाच शहरात राहणाऱ्या आणि भिन्न स्वभाव असणाऱ्या या दोघांची भेट होणार का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

WhatsApp channel

विभाग