मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Shiva Serial: 'शिवा' मालिकेत वाहतायत प्रेमाचे वारे, आशुला भेटणार का त्याची स्वप्नसुंदरी?

Shiva Serial: 'शिवा' मालिकेत वाहतायत प्रेमाचे वारे, आशुला भेटणार का त्याची स्वप्नसुंदरी?

Aarti Vilas Borade HT Marathi
Feb 17, 2024 12:46 PM IST

Shiva Serial 17th Feb Serial Update: गेल्या काही दिवसांपासून 'आई कुठे काय करते' मालिका बंद होणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. आता त्यामागिल सत्य समोर आले आहे.

Shiva Serial Update
Shiva Serial Update

Shiva Serial Update : छोट्या पडद्यावर सध्या वेगवेगळ्या विषयांवर नव्या मालिका प्रदर्शित होताना दिसत आहेत. त्यामधील काही मालिका टीआरपी यामध्ये देखील अव्वळ स्थान पटकावताना दिसत आहेत. झी मराठी वाहिनीवर १२ फेब्रुवारी रोजी 'शिवा' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेला पहिल्याच दिवसापासून प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता या मालिकेच्या आगामी भागात काय घडणार? हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

झी मराठीवर नुकतीच सुरु झालेली नवी मालिका 'शिवा' लोकांच्या मनात घर करण्यासाठी सज्ज आहे. प्रत्येक पात्राला अगदी पहिल्याभागा पासून प्रेक्षकांचं अपार प्रेम मिळत आहे. या आठवड्यात प्रेक्षक शिवा या मालिकेत पाहू शकतील शिवा आणि आशुतोषच्या जीवनातल्या होणाऱ्या हालचाली. मंदिरात गुरुजीं आशुतोषचे लवकरच लग्न होणार अशी बातमी देतात, पण देसाईंच्या घरी लक्ष्मी नाही तर दुर्गा प्रकट होणार हे देखील सांगतात, यावर सगळ्यांना धक्का बसतो.
वाचा: आम्हाला रॉकस्टार व्हायचे होते; राहुल देशपांडेचा रोमँटिक अंदाजातील 'अमलताश'चा ट्रेलर प्रदर्शित

दुसरीकडे दिव्या शिवाला वधू पाहण्याचा सोहळा थांबवण्याची विनंती करते. दरम्यान, दिव्याच्या या स्वार्थामुळे शिवा अडचणीत येते. येणाऱ्या भागात आपण आपण पाहू शकणार आहोत शिवानी शिवा कशी झाली, शिवाय एका पार्टीत काही पुरुष दिव्याशी गैरवर्तणूक करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा शिवा येऊन गुंडांपासून तिला वाचवते आणि तिकडे आशुतोष ही उपस्थित असतो. इकडे आशुचे बाबा रामचंद्र देसाई आशुच्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन दिव्याच्या घरी जाणार आहेत. सारख्या येणाऱ्या स्थळांना वैतागून दिव्या स्वतःच्या ऐवजी शिवाची कुंडली दाखवते. आता काय होणार जेव्हा शिवा आणि आशुतोषची कुंडली गुरुजींसमोर येणार? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. मालिकेच्या आगामी भागात प्रेक्षकांना त्यांच्या प्रश्नाची उत्तरे मिळणार आहेत.

WhatsApp channel

विभाग