Shiva Marathi Serial: सध्या मालिका विश्वात काही मालिका प्रचंड चर्चेत आहेत. ‘शिवा’ ही अशाच काही मालिकांपैकी एक आहे. ‘शिवा’ या मालिकेतील शिवानी म्हणजेच शिवा आणि आशुतोष यांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडत आहे. या मालिकेच्या येत्या भागांमध्ये अतिशय धमाकेदार कथानक पाहायला मिळणार आहे. या मालिकेत सध्या शिवा आणि आशु यांचं लग्न झालेलं पाहायला मिळालं आहे. मात्र, अजूनही आशु शिवाला पत्नी म्हणून स्वीकारण्यास तयार नाही. तो पावलोपावली शिवाचा अपमान करताना दिसतोय. मात्र, शिवा देखील आशुचं मन जिंकून घेण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.
'शिवा' मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. या मालिकेत रोजच काही ना काही घडामोडी घडताना दिसत आहे. नुकतेच आशु आणि शिवा तिच्या माहेरच्या घरी गेले होते. वस्तीत आणि शिवाच्या घरच्यांनी आशुचा खूप प्रेमाने पाहुणचार केल्यामुळे त्याला शिवाच्या आई आणि आजीसमोर घटस्फोटाचा विषय काढता आला नव्हता. आता पुन्हा घरी परतल्यावर आशुने सिताईला सांगितली आहे. मात्र, सिताई आता शिवाला तिच्या वचनाची आठवण करून देणार आहे. इतकाच नाही, तर आशुला घटस्फोट दे, असं देखील शिवाला सांगते. शिवाला या सगळ्याच खूप वाईट वाटलं आहे. तिने मनापासून या कुटुंबाचा स्वीकार करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आता शिवा आशुला घटस्फोट देण्याचा निर्णय घेणार आहे.
सिताईच्या हातात सही केलेले घटस्फोटाचे पेपर देताना शिवा येत्या सहा महिन्यात या घराण्याची सून म्हणून स्वतःला सिद्ध करेन, असे चॅलेंज देते. आता घरी नागपंचमीची पूजा करण्यासाठी शिवा नैवेद्याचे दिंड बनवण्याचे ठरवते. सिताई उर्मिलाला शिवाला मदत न करण्याचा सल्ला देणार आहे. आता शिवा एकदम वेगळ्याच रंगात आणि ढंगात घरात वावरताना दिसणार आहे. कुणाचीही मदत न घेता शिवा पुरणाची दिंड खूप उत्कृष्ट बनवणार आहे. मात्र, इतके चविष्ट दिंड खाल्ल्यानंतर सिताईला वाटणार आहे की, शिवाला नक्कीच कोणीतरी मदत केली असेल. दिंड खराब करण्याचा प्लॅन कीर्ती बनवते. पण, शिवा तो प्लॅन तिच्यावरच उलटवून लावते.
उर्मिला सिताईच्या डोक्याला तेल लावत असताना शिवा हळूच येते आणि स्वतःहून सिताईच्या डोक्याला तेल लावते, हे जेव्हा सिताईच्या लक्षात येतं, तेव्हा ती खूप नाराज होते. एकूणच काय, तर शिवा एक परिपूर्ण सुनेसारखी वागायला लागल्याचे दिसणार आहे. आता देसाईंच्या घरात शिवाची पहिली मंगळागौर साजरी करण्याची लगबग सुरू होणार आहे. मंगळागौरीच्या कार्यक्रमात सिताई, शिवा आणि सगळ्या बायका मिळून फुगडी खेळणार आहेत. जगदीशची म्हणजेच शिवाच्या काकाची बायको वेळ मिळताच सिताईला शिवाने आमचे घर बळकावलं आहे, असे सांगणार आहे. यावरून सिताई शिवाला जाब विचारायला जाणार आहे. तेव्हा, आशु शिवाची बाजू घेऊन जगदीश काका खूप कट कारस्थानी असल्याचं सांगणार आहे. पहिल्यांदाच आशु शिवाची बाजू घेणार आहे.