छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय पण तितकाच वादग्रस्त शो म्हणजे बिग बॉस मराठी. या शोमुळे काही कलाकारांचे नशीब चमकले आहे. या यादीमध्ये अभिनेता शिव ठाकरेचे नाव घेतले जाते. त्याने बिग बॉस मराठी सिझन २ची ट्रॉफी स्वत:च्या नावे केली. तसेत शिवचे वागणे, बोलणे प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला पडले. आज कोणत्याही मालिका किंवा चित्रपटात काम न करता शिवची लोकप्रियता तुफान आहे. आता शिवने केलेल्या व्यक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्याने 'फक्त महाराजांचे नाव घेऊ नका, गडांकडेही बघा' असे म्हटले आहे.
नुकताच प्लॅनेट मराठीवर 'आयुष्याची जय' हा एक पॉडकास्ट शो सुरु झाला आहे. आपल्या लाडक्या सेलिब्रिटींसोबत यात भरपूर गप्पा मारल्या जाणार आहेत. अनेकांना आपल्या लाडक्या कलाकारांबद्दलचे माहित नसलेले अनेक किस्से यावेळी शेअर केले जातील आणि या कलाकारांसोबत गप्पा मारणार आहे, सर्वांची लाडकी सूत्रसंचालिका जयंती वाघधरे. या शोच्या पहिल्याच भागात शिव ठाकरे सहभागी होणार असून यावेळी त्याने अनेक त्याच्या आयुष्याशी निगडित अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.
'आयुष्याची जय' या कार्यक्रमाचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये शिव ठाकरे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचा आदर, प्रेम, व्यक्त करताना दिसत आहे. त्याचे गडांप्रती असलेले प्रेमही यातून दिसत आहे. त्यामुळे या शोमधून शिव किती महाराजभक्त आहे, याचे दर्शन घडतेय. राजकारणी स्वतःच्या फायद्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा फक्त वापर करतात. त्यामुळे महाराजांचे फक्त नाव घेऊ नका, आमच्या गडांकडेही बघा, अशी विनंतीही शिवने यावेळी केली आहे. याव्यतिरिक्त शिवच्या आयुष्यातील अनेक गोष्टी त्याने इथे उलगडल्या आहेत.
वाचा: मनोज बाजपेयीचा 'भैय्या जी' ओटीटीवर रिलीज होणार, जाणून घ्या कधी आणि कुठे
‘बिग बॉस मराठी २’नंतर शिव ठाकरे ‘बिग बॉस १६’मध्ये देखील झळकला होता. तो हा शो जिंकू शकला नसला तरी, फर्स्ट रनर अप म्हणून त्याला भरपूर प्रसिद्धी मिळाली. हिंदी बिग बॉस पाहणाऱ्या प्रेक्षकांची मने देखील शिवने जिंकली. त्यानंतर शिव खतरों के खिलाडी या शोमध्ये दिग्गदर्शक रोहित शेट्टीसोबत मजामस्ती करताना दिसला. आता सध्या शिव कोणत्याही कार्यक्रमात दिसत नाही. पण त्याला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
संबंधित बातम्या