मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  मुनव्वर फारुकीच्या दुसऱ्या लग्नाबाबत शिव ठाकरे हे काय बोलून गेला! म्हणाला, ‘त्याच्या प्रत्येक लग्नसाठी...’

मुनव्वर फारुकीच्या दुसऱ्या लग्नाबाबत शिव ठाकरे हे काय बोलून गेला! म्हणाला, ‘त्याच्या प्रत्येक लग्नसाठी...’

Jun 15, 2024 07:42 AM IST

पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतल्यानंतर मुनव्वरने मेकअप आर्टिस्ट महजबीन कोतवालाशी लग्न केले आहे. ‘बिग बॉस’ फेम शिव ठाकरे याने मुनव्वरच्या लग्नाबाबत असं काही वक्तव्य केलं, ज्याची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे.

मुनव्वर फारुकीच्या दुसऱ्या लग्नाबाबत शिव ठाकरे हे काय बोलून गेला!
मुनव्वर फारुकीच्या दुसऱ्या लग्नाबाबत शिव ठाकरे हे काय बोलून गेला!

'बिग बॉस १७'चा विजेता आणि स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी सध्या त्याच्या दुसऱ्या लग्नामुळे खूप चर्चेत आहे. पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतल्यानंतर मुनव्वरने मेकअप आर्टिस्ट महजबीन कोतवालाशी लग्न केले आहे. त्याच्या दुसऱ्या लग्नाची बातमी ऐकून चाहते खूप खूश झाले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांनी मुनव्वरला त्याच्या लग्नाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. पण, त्याच्या त्याच्या या लग्नाची कुणालाच कल्पना नव्हती. नुकताच या नव्या जोडप्याचा एकत्र असलेला एक फोटोही समोर आला होता, ज्यात दोघे एकत्र केक कापताना दिसले होते. अशातच ‘बिग बॉस’ फेम शिव ठाकरे याने मुनव्वरच्या लग्नाबाबत असं काही वक्तव्य केलं आहे, ज्याची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे.

रवीना टंडनचा ‘तो’ व्हिडीओ खोटा! सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्याच्या विरोधात दाखल केला मानहानीचा दावा!

काय म्हणाला शिव ठाकरे?

मुनव्वर फारुकी आणि शिव ठाकरे यांच्यात खूप चांगली मैत्री आहे. हे दोघं अनेकदा एकत्र दिसतात. अशातच आता शिव ठाकरे याचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यात तो आपल्या खास मित्राच्या दुसऱ्या लग्नाबद्दल बोलताना दिसला आहे. शिव ठाकरे याचा एक व्हिडीओ टेलिरिपोर्टरच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये शिव ठाकरे म्हणतो की, ‘मुनव्वरचे प्रत्येक गोष्टीसाठी अभिनंदन. त्याच्या प्रत्येक लग्नासाठी, म्हणजे नवीन लग्नाबद्दल त्याचे अभिनंदन. या व्यक्तीच्या आयुष्यात खूप काही गोष्टी गेल्या आणि त्याचे चांगले आयुष्य सुरू झाले आहे. त्याचा मुलगाही खूप गोंडस आहे. मी त्याला बऱ्याच काळापासून ओळखतो. त्याने ’बिग बॉस १७'मध्ये प्रवेश करण्यापूर्वीपासून आम्ही एकमेकांचे मित्र होतो. '

ट्रेंडिंग न्यूज

मुनव्वर फारुकी हनीमूनला रवाना!

नुकतीच अशी बातमी समोर आली होती की, मुनव्वर फारुकी त्याची दुसरी बेगम म्हणजेच मेहजबीनसोबत हनीमूनवर गेला आहे. दोघांनी लोणावळ्यात एकत्र हनीमून एन्जॉय केला. मेहजबीनने तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यात ती काळ्या रंगाच्या सुंदर आउटफिटमध्ये पोज देताना दिसत आहे. मात्र, सर्वांचे लक्ष वेधून घेणारी गोष्ट काही औरच होती. हा फोटो शेअर होताच बॅकग्राऊंडमध्ये लोकांना काळ्या रंगाची रेंज रोव्हर दिसली. ही कार मुनव्वर फारुकी यांची असल्याची माहिती समोर आली आहे.

WhatsApp channel