MC Stan आणि अब्दूच्या वादावर शिव ठाकरेची प्रतिक्रिया, 'अशा छोट्या गोष्टींमुळे...'
Shiv Thakare: एमसी स्टॅन व अब्दु रोझिक यांच्यामध्ये खरच वाद झाला का? यावर शिव ठाकरेने प्रतिक्रिया दिली आहे.
‘बिग बॉस १६’ हा शो संपला असला, तरी अद्यापही याची चर्चा कमी झालेली नाही. या शोमधील स्पर्धकांच्या हाणामारी व्यतिरिक्त आणखी एक गोष्ट प्रेक्षकांच्या लक्षात राहिली ती म्हणजे या शो मधील ‘मंडली गँग.’ या सीझनमध्ये मंडली गँगची मैत्री चांगलीच गाजली होती. याच गटातील एमसी स्टॅन हा या शोचा विजेता ठरला होता. एमसी स्टॅनने या सीझन ट्रॉफी जिंकली, तेव्हा ही मंडली गँग देखील या आनंदात सामील झाली होती. मात्र, आता त्यांच्या मैत्रीत वितुष्ट आल्याचे समोर म्हटले जात होते. एमसी स्टॅन आणि अब्दू यांच्यात वाद झाल्याची चर्चा सुरु होती. आता शिव ठाकरेने यावर प्रतिक्रिया दिली आहे.
ट्रेंडिंग न्यूज
शिवने ईटाइम्सशी संवाद साधला. त्यावेळी त्याने अब्दु व स्टॅनच्या मैत्रीवर भाष्य केले. “त्यांच्यामध्ये गैरसमज निर्माण झाला आहे. अब्दु आणि एमसी स्टॅनमध्ये छोटासा गैरसमज झाला आहे. बाकी काही नाही” असे शिव म्हणाला.
वाचा: गौरी कुलकर्णी 'आई कुठे काय करते' मालिकेत दिसणार नाही, कारण...
पुढे तो म्हणाला, “मंडलीमध्ये सगळे एकमेकांबरोबर व्यवस्थित बोलत आहेत. काही दिवसांपूर्वीच एका पार्टीदरम्यान आम्ही सगळे भेटलो. फक्त एमसी स्टॅनला त्याच्या कॉन्सर्टमुळे या पार्टीत यायला जमले नाही. अशा छोट्या गोष्टींमुळे मंडली तुटणार नाही. जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत मंडली तुटू देणार नाही. लवकरच आम्ही सगळे भेटणार आहोत.”
एमसी स्टॅन आणि अब्दू रोजिक यांच्या व्यतिरिक्त, साजिद खान, शिव ठाकरे, अर्चना गौतम, सौंदर्या शर्मा, सुंबुल तौकीर खान आणि निम्रित कौर अहलुवालिया हे कलाकार देखील या मंडली गँगचा एक भाग होते. संपूर्ण सीझनमध्ये या सगळ्यांची मैत्री खूपच गाजली होती. काहीही झाले तरी ते नेहमीच एकमेकांच्या पाठीशी उभे असायचे. मात्र, आता त्यांच्यात वाद निर्माण झाले आहेत. खुद्द अब्दू रोजिक यानेच याला दुजोरा दिला होता.
विभाग