मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Shiv Thakare: तिने मला रात्री ११ वाजता बोलावलं; शिव ठाकरने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव

Shiv Thakare: तिने मला रात्री ११ वाजता बोलावलं; शिव ठाकरने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव

Aarti Vilas Borade HT Marathi
Mar 31, 2023 08:21 AM IST

Shiv Thakare on Casting Couch: शिव ठाकरने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्यामध्ये त्याने महिलांप्रमाणे पुरुषांनाही कास्टिंग काऊचचे अनुभव येतात असे सांगितले आहे.

Shiv Thakare
Shiv Thakare (HT)

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो बिग बॉस १६ संपून आता जवळपास महिना उलटला आहे. या शोच्या माध्यमातून लोकांच्या हृदयात आपले खास स्थान निर्माण करणारा शिव ठाकरे सतत चर्चेत असतो. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये शिवने कास्टिंग काऊचचा अनुभव सांगितला आहे. शिवचा हा अनुभव ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

शिवने नुकतीच हिंदुस्तान टाइम्सला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने करिअरच्या सुरुवातीला अनेक अडचणींचा सामना करवा लागल्याचे सांगितले आहे. कास्टिंग काऊचचा अनुभव सांगत शिव म्हणाला, 'चार बंगल्याच्या इथे एक मॅडम राहात होत्या. त्यांनी मला सांगितले की मी या अभिनेत्याचे करिअर करुन दिले, त्या अभिनेत्याचे करिअर करुन दिले. त्यानंतर तिने मला ऑडिशनसाठी रात्री ११ वाजता बोलावले. मी इतकाही साधा नाही की रात्री ऑडिशनला बोलावल्यावर काय होणार हे मला कळणार नाही. म्हणून मी त्या मॅडमला जमणार नाही असे सांगितले.'
वाचा: अशी पत्नी नको...; लग्नापूर्वी अमिताभ यांनी जयासमोर ठेवली होती अट

ट्रेंडिंग न्यूज

शिवने दिलेल्या उत्तरावर त्या मॅडम म्हणाली, 'काम नाही करायचे का तुला. इंडस्ट्रीमध्ये तुला कधी काम मिळणार नाही.' ते ऐकून शिव ठाकरे म्हणाला की, 'मी तुम्हाला या पुढे कधीही त्रास देणार नाही. ती महिला मला समजावण्याचा प्रयत्न करत होती आणि माझे मन बदलत होती.'

WhatsApp channel