Shiv Thakare Prank Video: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईलच याचा नेम नसतो. कधीकधी अनेकांच्या आयुष्य सोशल मीडिया बदलून टाकते. पण सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये मराठमोळ्या अभिनेत्याचा विचित्र लूक दिसत आहे. या लूकमध्ये त्या अभिनेत्याला ओळखणे देखील कठीण होऊन बसले आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये अभिनेत्याच्या तोंडावर, केसात फोड आल्याचे दिसत आहे. तसेच अभिनेत्याच्या पाठिला बाक आला आहे. अभिनेत्याचा हा भयानक लूक पाहून अनेकजण घाबरले आहेत. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून शिव ठाकरे आहे.
वाचा: अशोक सराफ आणि सचिन पिळगावकर पुन्हा एकत्र, येणार 'या' सुपरहिट सिनेमाचा दुसरा भाग
अभिनेता शिव ठाकरेने स्वत: सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये शिवच्या चेहऱ्यावर प्रोस्थॅटिक मेकअप दिसत आहे. त्यानंतर त्याचा चेहरा पूर्ण बदललेला दिसत आहे. हा बदललेला लूक घेऊन शिव रस्त्यावर चलताना दिसत आहे. तो रिक्षावाल्याकडे जाऊन भीक मागताना दिसत आहे. तसेच तो एका शोरुम बाहेर जाऊन असतो तेवढ्यात तेथील सिक्युरिटी गार्ड त्याला हकलून देतो. एक महिला शिवला पाहून भयानक घाबरते आणि जोरजोरात ओरडू लागते. व्हिडीओच्या शेवटी एक रिक्षाचालक त्याला पैसे देतो आणि सर्वांचे मन जिंकतो.
सोशल मीडियावर शिवचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. एका यूजरने 'शिक्षावाल्याने मन जिंकले' असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने 'प्रँक असे करा की सर्वजण घाबरले पाहिजेत' अशी कमेंट केली आहे. तिसऱ्या एका यूजरने 'शेवट मराठी माणूस कामाला आला ही आहे ओळख मराठी माणसांची सलाम' अशी कमेंट केली आहे.
शिव ठाकरेच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तो सध्या 'झलक दिखला जा' या शोमध्ये डान्सचा जलवा दाखवताना दिसत आहे. या शोमध्ये अरशद वारसी, फराह खान आणि मलायका अरोरा परिक्षक म्हणून दिसत आहेत. २०१७मध्ये शिव 'एमटीवी रोडीज रायजिंग'मध्ये स्पर्धक म्हणून दिसला होता. त्यानंतर २०१९मध्ये तो बिग बॉस मराठी सिझन २ दिसला. त्याने हा शो स्वत:च्या नावे केला. त्यापाठोपाठ शिव हिंदी बिग बॉसचे सिझन १६मध्ये दिसला होता. त्यानंतर तो खतरों के खिलाडी सिझन १३मध्ये सहभागी झाली. आता झलक दिखलाजा हा शो शिव जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.