मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Prarthana Behere: अभिनेत्रीने छत्रपती शिवाजी महाराजांचा केला एकेरी उल्लेख, शिवभक्तांनी नाराजी व्यक्त करताच मागितली माफी

Prarthana Behere: अभिनेत्रीने छत्रपती शिवाजी महाराजांचा केला एकेरी उल्लेख, शिवभक्तांनी नाराजी व्यक्त करताच मागितली माफी

Aarti Vilas Borade HT Marathi
Feb 20, 2024 08:42 AM IST

Prarthana Behere Apology: अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी केला होता. त्यानंतर तिने लगेच शिवभक्तांची माफी मागितली आहे.

Prarthana Behere
Prarthana Behere

Shiv Jayanti: छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्याचा पाया रचला. स्वराज्य स्थापन करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी शत्रूंशी लढा देऊन, त्यांना परतवून लावले. १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९४वी जयंती होती. महाराष्ट्रात ठिकठिकाणी शिवजयंती उत्सोव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. राज्यभरात अनेक ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, एका कार्यक्रमात अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने महाराजांचा उल्लेख एकेरी केला. शिवप्रेमींच्या भावना दुखावल्यानंतर तिने तातडीने माफी मागितली.

लातूरमधील उदगीर येथील मॉलच्या उद्धाटनासाठी अभिनेत्री प्रार्थना बेहेरेला बोलावण्यात आले होते. उद्धाटनादरम्यान शुभेच्छा देताना सलग चार-पाचवेळा तिने महाराजांचा एकेरी शब्दात उल्लेख केला. त्यामुळे लातूरमधील शिवभक्तांकडून तिचा निषेध करण्यात येत आहे. तसेच अभिनेत्रीच्या स्वागतासाठी लावण्यात आलेले बॅनरदेखील फाडण्यात आले आहेत. यानंतर प्रार्थनाने आता माफी मागावी, अशी मागणी शिवप्रेमींकडून करण्यात येत आहे.
वाचा: अमेरिकेत शिवजयंती! अभिनेत्रीने तयार केला बर्फाचा किल्ला

काय नेमके घडले?

कलाकार हे सतत अनेक कार्यक्रमाला हजेरी लावताना दिसतात. नुकताच प्रार्थना लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे एका व्यापारी प्रतिष्ठानच्या कार्यक्रमात दिसली. यावेळी तिने छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केला. अभिनेत्रीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. संतप्त झालेल्या शिवप्रेमींनी उदगीर शहरामध्ये अभिनेत्रीचे लागलेले बॅनर फाडत संताप व्यक्त केला. अभिनेत्रीच्या ही बाब लक्षात आल्यानंतर तिने नवा व्हिडीओ बनवून शिवप्रेमींची माफी मागितली आहे.

प्रार्थना बेहेरेने मागितली माफी

प्रार्थनाने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत मागितली माफी. "आज मी उदगीर येथे किसान मॉलच्या उद्घाटनाला आले होते. तिथे आल्यावर माझ्याकडून चुकून काही बोलण्यात आले असेल तर त्या बद्दल मी तुम्हा सर्वांची माफी मागू इच्छिते. कृपा करून मला माफ करा, माझा त्या बोलण्याचा उद्देश चुकीचा नव्हता. मी परत म्हणते की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त तुम्हा सर्वांना शुभेच्छा. छत्रपती शिवाजी महाराज की जय” असे ती म्हणाली.

IPL_Entry_Point

विभाग