Shilpa Shinde Video: छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय पण तितकाच वादग्रस्त शो म्हणून 'बिग बॉस' पाहिला जातो. सध्या बिग बॉसचा १८वा सिझन सुरु आहे. लवकरच या शोचा विजेता घोषीत केला जाणार आहे. त्यापूर्वी बिग बॉस ११ची विजेती, अभिनेत्री शिल्पा शिंदेने या शोबाबत धक्कादायक वक्तव्य केले आहे. तिने थेट शोच्या निर्मात्यांवर प्रेक्षकांना मूर्ख बनवल्याचा आरोप केला आहे. तसेच शोचा विजेता हा आधीच ठरलेला असतो असे देखील म्हटले आहे.
शिल्पा शिंदेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये शिल्पा बिग बॉस या रिअॅलिटी शोविषयी बोलताना दिसत आहे. “मला माहित नाही, पण काही लोकांना कळले आहे की, निर्माते विजेते ठरवतात. ते स्वत: विजेत्याची निवड करतात, त्यांच्या घरातून उचलतात आणि विजेते दाखवतात. आता चॅनेलची जी काही रणनीती आहे, ती लोकांनाही कळली आहे. त्यामुळेच लोक हा शो जास्त बघत नाहीत. कारण तुम्ही एखाद्याला काही प्रमाणात मूर्ख बनवू शकता” असे शिल्पा म्हणाली.
शिल्पा शिंदेचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. अनेक नेटकऱ्यांनी तिच्या या व्हिडीओवर कमेंट करत तिला पाठिंबा दिला आहे. एका यूजरने, “हे खरे आहे” अशी कमेंट केली आहे. दुसऱ्या एका यूजरने, “याचा अर्थ असा आहे की निर्मात्यांनी तुम्हाला विजेते बनवले आहे, तुम्ही तितके पात्र नव्हता” असे म्हणत शिल्पालाच प्रश्न विचारला आहे. तिसऱ्या एका यूजरने, “हो, कारण हिनाने शो जिंकला” असे म्हटले आहे. सध्या शिल्पाचा हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे.
वाचा : दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता प्रभास अडकणार विवाहबंधनात, कोण आहे ती मुलगी?
अभिनेत्री शिल्पा शिंदे ‘भाभीजी घर पर हैं’ या मालिकेतील अंगुरी भाभीच्या भूमिकेमुळे घराघरात पोहोचली. ‘बिग बॉस सीझन ११’ मध्ये शिल्पा शिंदे आणि हिना खान यांच्यात चुरशीची स्पर्धा होती, पण शिल्पा शिंदेने ट्रॉफी जिंकली. मात्र, त्यावेळी सोशल मीडियावर अनेकांचा असा विश्वास होता की हिना खान ट्रॉफी जिंकण्यासाठी पात्र आहे. आता बिग बॉसच्या १८व्या सिझनचा ग्रँड फिनाले १९ जानेवारी रोजी पार पडणार आहे.
संबंधित बातम्या