Shilpa Shinde: झलकमधून आउट होताच करण जोहरवर संतापली शिल्पा शिंदे, माधुरी आणि नोरावरही साधला निशाणा!
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Shilpa Shinde: झलकमधून आउट होताच करण जोहरवर संतापली शिल्पा शिंदे, माधुरी आणि नोरावरही साधला निशाणा!

Shilpa Shinde: झलकमधून आउट होताच करण जोहरवर संतापली शिल्पा शिंदे, माधुरी आणि नोरावरही साधला निशाणा!

Published Oct 28, 2022 12:46 PM IST

Jhalak Dikhhla Jaa Season 10: झलक दिखला जा सीजन १० मधून आउट झाल्यावर सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत शिल्पा शिंदेने शोच्या जजवर अर्थात करण जोहर, माधुरी दीक्षित आणि नोरा फतेहीवर निशाणा साधला आहे.

झलक दिखला जा १०
झलक दिखला जा १०

शिल्पा शिंदे एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आहे. 'भाभीजी घर पर है' या कॉमेडी मालिकेत अंगूरी भाभीच्या भूमिकेतून तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. यानंतर ती बिग बॉसमध्येही दिसली. ही अभिनेत्री बिग बॉसची विजेती देखील आहे. नुकतंच ती, ती 'झलक दिखला जा' या डान्स शोमध्ये दिसली होती. ही अभिनेत्री काही काळापूर्वी शोमधून आउट झाली आहे, पण तिला शोमधील काही गोष्टी आवडल्या नाहीत. त्यामुळेच त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत शोच्या जजवर निशाणा साधला आहे.

करण जोहरवर साधला निशाणा

'झलक दिखला जा १०' शोमधून बाहेर पडल्यानंतर शिल्पा शिंदेने शोच्या जजच्या विरोधात व्हिडीओ पोस्ट केला आहे. अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये शिल्पा तिची नाराजी व्यक्त करताना दिसत आहे. या संपूर्ण व्हिडीओमध्ये अभिनेत्रीने करण जोहरवर निशाणा साधला आहे. अभिनेत्रीने सर्वप्रथम दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आणि सांगितले की हा व्हिडीओ खास 'झलक दिखला जा' च्या जजसाठी बनवला आहे.व्हिडीओमध्ये अभिनेत्री म्हणाली, डान्स रिअ‍ॅलिटी शोच्या न्यायाधीशांनी स्पर्धकांच्या कामगिरीचा आदर केला पाहिजे आणि विचारपूर्वक त्यांचे मत व्यक्त केले पाहिजे. शिल्पा म्हणते- माझा हा व्हिडीओ झलक दिखला जा पॅनलमध्ये बसलेल्या परीक्षकांसाठी आहे.

माधुरी आणि नोराबद्दलही बोलली शिल्पा

यानंतर शिल्पा शिंदेने आणखी एक व्हिडीओ पोस्ट केला आणि सांगितले की ती 'झलक दिखला जा' शोच्या विरोधात नाही. यामध्ये ती म्हणतेय, "मला शो आवडतो. मी अजूनही शो फॉलो करतेय. मला प्रत्येकजण आवडतो. परंतु करण सरांना डान्स अजिबात येत नसेल तर करण सरांनी कमेंट करू नये. त्याऐवजी मेकअप, वेशभूषा यावर प्रतिक्रिया द्याव्यात.माधुरी मॅम (माधुरी दीक्षित)ला डान्सवर बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण निया भावूक झाली की त्या गडबडतात. तुम्ही कलाकार आहात, तुम्ही असे बोलू शकत नाही. " पुढे नोरावर निशाणा साधत ती म्हणाली "तुम्ही हिंदी चॅनेलच्या पॅनलवर बसले आहात नोरा, थोडं हिंदी शिकून आलात तर बरं होईल. फक्त डान्स डान्स नसतं.

अभिनेत्रीने निया शर्माच्या शेवटच्या परफॉर्मन्सवर भाष्य केले आहे. एकंदरीत शिल्पाने नियाला दिलेले गुण, तिचा अभिनय, या सर्व प्रतिक्रियांवर भाष्य केले आहे. शिल्पा शिंदेच्या या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.

Whats_app_banner