Shilpa Shinde Break Up: छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री म्हणून शिल्पा शिंदे ओळखली जाते. तिने रिअॅलिटी शो 'बिग ११'ची टॉफ्री स्वत:च्या नावे केली. शिल्पा तिच्या व्यावसायिक आयुष्यासोबतच खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. तिने एका अभिनेत्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी तिने जय्यत तयारी केली होती. पण लग्नाच्या महिनाभरापूर्वी दोघांमध्ये असे काही झाले की त्यांचा ब्रेकअप झाला. या अभिनेत्याने आता स्वत:वर वक्तव्य केले आहे.
शिल्पा शिंदे २००८ मध्ये लग्न करणार होती. 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेतील एका अभिनेत्याच्या प्रेमात ती पडली होती. त्यांनी लग्नाची तारीखही जाहीर केली होती, लग्नाचा ड्रेस खरेदी केला होता आणि लग्नाचे कार्ड्सही वाटले होते. मात्र, त्यानंतर दोघांमध्ये असं काही घडलं की, लग्नाच्या एक महिना आधी शिल्पाने ब्रेकअप केला. आता नेमकं काय झालं हे चला जाणून घेऊया..
'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेतील रोमित राजला शिल्पा डेट करत होती. या मालिकेत रोहित पौडरची भूमिका रोमित राज साकारत आहे. रोमितने नुकतीच टेलिचक्करला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने शिल्पा शिंदेसोबतच्या अफेरविषयी वक्तव्य केले. 'मी नऊ वर्षांपासून टीव्ही इंडस्ट्रीत आहे. मी कधीच कुणाला डेट केलं नव्हतं. मी शिल्पाला फक्त सहा महिने डेट केले. आम्ही सहा महिने डेट केले आणि नंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, लग्नाच्या एक महिनाआधी आमचा ब्रेकअप झाला. या गोष्टीला आता १५ वर्षे झाली. त्यानंतर आम्ही एकमेकांना भेटलो नाही. ती तिच्या आयुष्यात आनंदी आहे आणि मी माझ्या आयुष्यात सुखी आहे' असे रोमित म्हणाला.
वाचा: अशी मी मदनमंजिरी सुबक ठेंगणी लखलखते सुंदरी; 'फुलवंती'मधील पहिल्या गाण्याने लावले प्रेक्षकांना वेड
इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, शिल्पाने एका मुलाखतीत तिच्या लग्नाबद्दल सांगितले. शिल्पा म्हणाली होती की, 'मी माझ्या लग्नासाठी सर्वस्व पणाला लावले होते. एक मुलगी असल्याने माझी, नवऱ्याची आणि त्याच्या कुटुंबाप्रती काय जबाबदारी आहे, हे मला ठाऊक होतं. त्यामुळे मी त्याच्या इच्छेनुसार सर्व काही करत होते. पण तरीही त्याला माझ्याकडून जास्त अपेक्षा होत्या. माझी लग्नाची तयारी केली होती, लग्नाचा ड्रेस खरेदी केला होता, मी माझे दागिने विकत घेतले होते आणि कार्ड्सही छापले होते. लग्नाच्या एक महिना आधी मला ब्रेकअप करावा लागला. हे खूप दु:खद आहे, पण मला वाटते मी योग्य निर्णय घेतला. मला खूप आनंद आहे की निदान आता मला प्रत्येक गोष्टीसाठी अॅडजस्टमेंट करावी लागत नाही. मी आता माझे निर्णय स्वत: घेऊ शकतो.'