Eknath Shinde : सध्या सगळीकडे गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळते. कलाकारांपासून ते बड्या नेत्यांपर्यंत सर्वांच्या घरी बाप्पाचे आगमन झाल्याचे पाहायला मिळत आहे. रविवारी बॉलिवूडमधील जवळपास सर्वच कलाकारांनी वर्षा बंगल्यावर जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांच्या निवासस्थानी कलकारांनी ग्लॅमरस अंदाजात हजेरी लावली. यामध्ये शिल्पा शेट्टी, मृणाल ठाकूर, दिशा पटाणी, सलमान खान आणि इतर काही बॉलिवूड कलाकारांचा समावेश आहे. कलाकार आणि त्यांचे लूक्स चला पाहूया...
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने एकनाथ शिंदे यांच्या गणपती दर्शनासाठी खास हजेरी लावली होती. यावेळी तिने सुंदर अशी साडी नेसली होती. हिरव्या आणि गुलाबी पट्टे असलेल्या साडीमध्ये शिल्पा अतिशय सुदंर दिसत आहे. तिच्या या लूकने सर्वांचे लक्ष वेधले आहे. या साडीवर शिल्पाने पांढऱ्या रंगाची बॅग घेतली आहे. तसेच गळ्यात चोकर घातले आहे. सध्या सोशल मीडियावर शिल्पाचा हा लूक व्हायरल झाला आहे.
मृणाल ठाकूर पांढऱ्या रंगाचा सलवार सूट घालून आली आहे. मृणाल नेहमीच अतिशय सुंदर दिसते. पण तिचा हा लूक सर्वांचे लक्ष वेधणारा आहे. मृणालने एका खांद्यावर पांढऱ्या रंगाचा रेशमी दुपट्टा घेतला आहे. मॅचिंग व्हाईट हील्स, स्टेटमेंट इयररिंग्स आणि मोकळे केस या लूकमध्ये मृणाल अतिशय सुंदर दिसत आहे.
अभिनेत्री दिशा पटाणीने काळ्या रंगाचा चुडीदार ड्रेस परिधान केला आहे. त्यावर तिने काळ्या रंगाचा दुपट्टा घेतला आहे. या दुपट्यावर सोनेरी झरीचे वर्क दिसत आहे. मोकळे केस, कानात मोठे कानातले आणि मोकळ्या केसांमध्ये दिशा अतिशय सुंदर दिसत आहे. सोशल मीडियावर दिशाच्या या लूकची चर्चा रंगली आहे.
सोनाक्षी सिन्हा आणि तिचा पती जहीर इक्बालदेखील गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी पोहोचले होते. सोनाक्षीने फिकट रंगाचा ड्रेस परिधान केला होता. कपाळाला टिकली, कानात मोठे कानातले, मोकळे केस या लूकमध्ये सोनाक्षी अतिशय सुंदर दिसत आहे. सोनाक्षीला मॅचिंग म्हणून जहीरने पांढऱ्या रंगाची जीन्स आणि त्यावर प्रिंटेड शर्ट घातला आहे. दोघेही एकत्र अतिशय सुंदर दिसत आहेत. त्यांचे हा लूक सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.
वाचा: 'बिग बॉस मराठी'साठी अभिजीत-निक्कीने घेतले लाखो रुपये, सूरज चव्हाणला आठवड्याला किती मिळते फी?
सध्या सोशल मीडियावर कलाकारांचे हे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. यामधील त्यांचा लूक सर्वांचे विशेष लक्ष वेधताना दिसत आहेत.