नुकताच मिस यूनिवर्स २०२३ ही स्पर्धा पार पडली आहे. ७२व्या या मिस यूनिवर्स स्पर्धेत निकारागुआ येथील शेन्निस पलासियोसने किताब जिंकला. जगभरातील सुंदर महिलांना मागे टाकत शेन्निसने 'मिस यूनिवर्स २०२३' स्पर्धेतील विजेता पदकावर स्वत:चे नाव कोरले. आता ही शेन्निस आहे तरी कोण? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
मिस यूनिवर्स २०२२ची विजेती आर बोनीने शेन्निस पलासियोसला मिस यूनिवर्स २०२३चा ताज घातला. ताज घातल्यावर शेन्निस भावनिक झाली. तिच्या डोळ्यात पाणी आले. शेन्निस पलासियोसला ही निकारागुआमधील पहिला महिला आहे जिने मिस यूनिवर्सचा किताब जिंकला आहे. त्यामुळे ब्यूटी क्वीनचा किताब जिंकणे तिच्यासाठी खास होते.
कोणत्या एका महिलेचे आयुष्य एक वर्ष जगायला आवडेल असा प्रश्न अंतिम सामन्यात विचारण्यात आला होता. यावेळी शेनिसच्या उत्तराने परिक्षकांची मने जिंकली. महिला हक्क कार्यकर्त्या आणि स्त्रीवादाची जननी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेरी वोलस्टोनक्राफ्टचे आयुष्य एक वर्ष जगायला आवडेल, असे शेन्निस म्हणाली.
मिस यूनिवर्स २०२३ या स्पर्धेच्या टॉप ३ स्पर्धकांमध्ये थायलंड आणि ऑस्ट्रेलियामधील दोन मॉडेलने स्थान पटकावले होते. मात्र, शेन्निस पलासियोसने मिस यूनिवर्स स्पर्धेत स्वत:चे नाव कोरले. थायलंडची एन्टोनिया पोर्सिल्ट ही पहिली रनरअप ठरली. तर ऑस्ट्रेलियाची मोरया विल्सन ही सेकंड रनरअप ठरली. यावर्षी मिस यूनिवर्स स्पर्धेत भारतातील श्वेता शारदा देखील सहभागी झाली होती. चंदीगढमधील श्वेताने टॉप २० फायनलिस्टमध्ये स्वत:ची वेगळी अशी जागा तयार केली होती. यावेळी पहिल्यांदाच पाकिस्तानमधील एका मॉडेलने मिस यूनिवर्स २०२३ या स्पर्धेत सहभाग घेतला होता.
७२वी मिस यूनिवर्स ही स्पर्धा अल सल्वाडोरची राजधानी सॅन सेल्वाडोर येथे पार पडली. यंदा ८४ देशांमधील सुंदर मॉडेलने या स्पर्धेत सहभाग घेतला होता. शेन्निस पलासियोसने या मॉडेलवर मात करत 'मिस यूनिवर्स २०२३' या स्पर्धेवर स्वत:चे नाव कोरले.