बॉलिवूड अभिनेता कार्तिन आर्यनचा गेल्या काही दिवसांपासून 'शहजादा' हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आणि टीझर पाहाता चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता होती. १७ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यन पहिल्यांदा अॅक्शन अवतारामध्ये दिसत आहे. आता या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली आहे हे समोर आले आहे.
'शहजादा' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरताना दिसत आहे. रविवारी म्हणजेच प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी ७.३० कोटी रुपयांची कमाई केली आहे. पहिल्या दिवशी चित्रपटाने १९.९५ कोटी रुपये कमावले आहेत. चित्रपटाला प्रेक्षक मिळत नसल्याचे समोर येत आहे. एकंदरीत हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरताना दिसत आहे.
वाचा: कसा आहे कार्तिक आर्यनचा 'शहजादा'? जाणून घ्या…
कार्तिक आर्यनचा ‘शहजादा’ हा चित्रपट अल्लू अर्जुनचा साऊथ चित्रपट ‘अलवैकुंठपुरम’चा रिमेक आहे. रोहित धवनने याचे दिग्दर्शन केले आहे. कार्तिक आणि क्रितीशिवाय या चित्रपटात परेश रावल, मनीषा कोईराला आणि रोनित रॉय यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.
कार्तिक आर्यन हा सध्या नव्या चित्रपटांच्या कामात अतिशय व्यस्त आहे. २०२२ हे वर्ष कार्तिकसाठी खूपच लकी ठरले होते. २०२२मध्ये यावर्षी त्याचा 'भूल भुलैया २' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला होता. यानंतर कार्तिककडे चित्रपटांची रांग लागली. ‘भूल भुलैय्या २’ आणि ‘फ्रेडी’नंतर ‘शहजादा’, ‘हेरा फेरी ३’ अशा बहुचर्चित चित्रपटांमध्ये कार्तिक मुख्य भूमिकेत दिसणार आहे.