मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Three Of Us Movie Review: शेफाली शाहचा 'थ्री ऑफ अस' कसा आहे? वाचा रिव्ह्यू

Three Of Us Movie Review: शेफाली शाहचा 'थ्री ऑफ अस' कसा आहे? वाचा रिव्ह्यू

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 01, 2024 11:31 AM IST

Shefali Shah: 'थ्री ऑफ अस' या चित्रपटात शेफाली शाह, स्वानंद किरकिरे आणि जयदीप अहलावत हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. आता हा चित्रपट कसा आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. चला जाणून घेऊया...

Three Of Us
Three Of Us

आजकाल ओटीटी विश्व हे मनोरंजनाचे मोठे साधन झाले आहे. वेगवेगळ्या विषयांवर आधारीत सिनेमे आणि वेब सीरिज ओटीटीवर प्रदर्शित होताना दिसतात. नुकताच नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 'थ्री ऑफ अस' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अभिनेत्री शेफाली शाह, स्वानंद किरकिरे आणि जयदीप अहलावत हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. आता या चित्रपटात नेमकी काय कथा दाखवण्यात आली आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

'थ्री ऑफ अस' या चित्रपटात मुंबईत राहणाऱ्या शैलाजी कथा दाखवण्यात आली आहे. तिला बऱ्याच वर्षांनंनतर तिच्या गावी वेंगुर्ल्यात जाण्याची इच्छा होते. त्यासाठी ती पती दीपांकर देसाईकडे हट्ट करते. बायोकाची हट्टा खातर दीपांकर तिला घेऊन आठवडाभरासाठी कोकणात जातो. तिकडे गेल्यावर ती पुन्हा प्रदीपला भेटते. शैलजाला भेटल्यावर प्रदीपला त्याची हरवलेली कविता गवसते. या चित्रपटात वेगवेगळ्या आठवणी दाखवण्यात आल्या आहेत. लहानपणीचे प्रेम, शाळा, मामाचे गाव, घर, गावची जत्रा, वेगवेगळ्या करामती या सगळ्या गोष्टींभोवती चित्रपटाची कथा फिरते.
वाचा: सुझान खान एअरपोर्टवरुन माघारी, काय झालं नेमकं?

शैलजा भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळाच्या उंबऱ्यावरती उभी असलेली पाहायला मिळते. तिला स्मृतिभ्रंश हा आजार झालेला असतो. तिचा मुलगा आणि पती तिची काळजी घेताना दाखवले आहेत. तिचा वेंगुर्ल्यात बालपणीच्या प्रेमासह कोकणच्या विस्तीर्ण समुद्रकिनाऱ्यावरून प्रवास हा भारावून टाकणारा आहे.

'थ्री ऑफ अस' हा चित्रपट २४ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रदर्शित झाला होता. दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. मात्र, या चित्रपटाची फारशी चर्चा झाली नाही. आता हा चित्रपट जेव्हा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला तेव्हा प्रेक्षकांनी कौतुक केले आहे. चित्रपटातील अतिप्रम डायलॉग, उत्तम संवाद, कॅमऱ्यात कैद झालेले सुंदर सीन्स, कोकणातील नयनरम्य दृश्ये कौतुकास्पद आहेत. तसेच शैलाजचे मुंबईतील जीवन अगदी जीवंत वाटते.

WhatsApp channel

विभाग