मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Viral Video: विमानतळावर पतीसोबत लिपलॉक करताना दिसली ‘काँटा लगा गर्ल’; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणतायत...

Viral Video: विमानतळावर पतीसोबत लिपलॉक करताना दिसली ‘काँटा लगा गर्ल’; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणतायत...

Harshada Bhirvandekar HT Marathi
Mar 13, 2024 11:22 AM IST

Shefali Jariwala Liplock Viral Video: नुकतीच शेफाली जरीवाला विमानतळावर स्पॉट झाली. यावेळी पापाराझी तिचे फोटो काढत होते. त्याचवेळी तिचा लिपलॉकचा क्षणही कॅमेऱ्यात कैद झाला.

Shefali Jariwala Liplock Viral Video
Shefali Jariwala Liplock Viral Video

Shefali Jariwala Liplock Viral Video: ‘काँटा लगा गर्ल’ म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री शेफाली जरीवाला तिच्या बोल्डनेसमुळे प्रसिद्ध आहे. एंटरटेनमेंट इंडस्ट्रीत आल्यापासून तिच्या बोल्डनेसबद्दलच चर्चा होत आहे. स्वतःचे बोल्ड फोटो पोस्ट करून अभिनेत्री इंटरनेटचे तापमान वाढवत असते. कधी तिचा बिकिनी लूक, तर कधी तिची स्टाईल चाहत्यांना भुरळ घालते. दरम्यान, शेफाली जरीवालाचा आणखी एक बोल्ड व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तिने कॅमेऱ्यासमोरच विमानतळावरच्या भर गर्दीत पतीला लिपलॉक किस केला आहे. यामुळे आता नेटकरी त्यांना ट्रोल करत आहेत.

नुकतीच शेफाली जरीवाला विमानतळावर स्पॉट झाली. यावेळी पापाराझी तिचे फोटो काढत होते. त्याचवेळी तिचा लिपलॉकचा क्षणही कॅमेऱ्यात कैद झाला. अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोर लिप-लॉक करण्यात अजिबात कचरली नाही. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी तिचा पती-अभिनेता पराग त्यागी तिला सोडायला विमानतळावर सोडण्यासाठी आला होता. आता त्यांच्या गुडबाय किसने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. काही लोक या कपलला ट्रोल करत आहेत.

Viral Video: मी याचा फोन फोडू का?; सई ताम्हणकर का आणि कुणावर भडकली? व्हिडीओ होतोय व्हायरल

अभिनेत्रीला किस करताना पाहून लोक संतापले!

शेफाली जरीवालाचा हा खाजगी क्षण कॅमेऱ्यासमोर पाहून तिचे चाहतेही निराश झाले असून, या व्हिडीओवर कमेंट करून आपली नाराजी व्यक्त करत आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर एका व्यक्तीने म्हटले की, 'हे सर्व तुम्ही घरी करू शकला नसतात का? काही मर्यादा असतात, हे दोघे कुठेही सुरू होतात.’ आणखी एकाने ट्रोल करत लिहिले की, 'पहिल्यांदा मला वाटले की, ते तिचे वडील आहेत.' आणखी एकाने लिहिले की, 'ही चुम्माचाटी तुमच्या घरी जाऊन करा.' तर, 'हे सगळं घरूनच करून यायचं होतं’, असं एकाने म्हटलं आहे.

शेफाली झाली ट्रोल!

या व्हिडीओमुळे शेफाली जरीवाला चांगलीच ट्रोल होत आहे. यावर कमेंट करताना एका युजरने लिहिले की, 'हे कृत्य यांना कारमध्ये देखील करता आले असते. असा सार्वजनिकरित्या दिखावा करण्याची गरज नाही.' आणखी एका व्यक्तीने संतापून कमेंट केली की, 'एक काम करा, आता इथेच हनिमूनही साजरा करा.' या व्हिडीओवर अशाच संतप्त प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

IPL_Entry_Point