शत्रुघ्न सिन्हा सोनाक्षीच्या लग्नाला उपस्थित राहणार नाहीत? अखेर अभिनेत्याने सोडले मौन! म्हणाले…
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  शत्रुघ्न सिन्हा सोनाक्षीच्या लग्नाला उपस्थित राहणार नाहीत? अखेर अभिनेत्याने सोडले मौन! म्हणाले…

शत्रुघ्न सिन्हा सोनाक्षीच्या लग्नाला उपस्थित राहणार नाहीत? अखेर अभिनेत्याने सोडले मौन! म्हणाले…

Jun 20, 2024 07:37 AM IST

सोनाक्षीचे वडील झहीरसोबतच्या लग्नावरून तिच्यावर नाराज असून ते लग्नाला जाणार नाहीत, अशी चर्चा सुरू होती. मात्र, आता खुद्द शत्रुघ्न सिन्हा यांनी यावर मौन सोडले आहे.

शत्रुघ्न सिन्हा सोनाक्षीच्या लग्नाला उपस्थित राहणार नाहीत? अखेर अभिनेत्याने सोडले मौन!
शत्रुघ्न सिन्हा सोनाक्षीच्या लग्नाला उपस्थित राहणार नाहीत? अखेर अभिनेत्याने सोडले मौन!

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा लवकरच तिचा बॉयफ्रेंड झहीर इक्बालसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. सोनाक्षी २३ जूनला झहीर इक्बालसोबत लग्न करणार आहे. सोनाक्षीच्या लग्नाची बातमी समोर आल्यापासून लोक तिच्या कुटुंबाबद्दल अनके वेगवेगळे कयास बांधत आहेत. सोनाक्षीचे वडील अर्थात अभिनेते शत्रुघ्न सिन्हा आपल्या मुलीच्या लग्नामुळे नाराज आहेत आणि त्यात सहभागी होणार नाहीत, असा दावा अनेक बातम्यांमधून केला जात होता. मात्र, आता अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांनी यावर मौन सोडले आहे. जाणून घेऊया सोनाक्षी सिन्हाचे वडील शत्रुघ्न सिन्हा काय म्हणाले.

एक-दोन नव्हे, अभिषेक बच्चनने एकाच वेळी खरेदी केले ६ आलिशान फ्लॅट! किती पैसे मोजले माहित्येय का?

काय म्हणाले शत्रुघ्न सिन्हा?

टाइम्स नाऊशी खास संवाद साधताना अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी लग्नाला न जाण्याच्या बातमीला पूर्णविराम दिला आहे. यावेळी बोलताना शत्रुघ्न सिन्हा म्हणले की, ‘मला सांगा, हे कोणाचं आयुष्य आहे? हे माझ्या एकुलत्या एक मुलीचे आयुष्य आहे, ज्याचा मला अभिमान आहे आणि तिच्यावर माझे खूप प्रेम आहे. ती मला तिच्या शक्तीचा आधारस्तंभ म्हणते. मी लग्नाला नक्की जाईन. मी का आनंदी असू नये किंवा लग्नाला का जाऊ नये? तिचे सुख हेच माझे सुख आहे आणि माझे सुख हेच तिचे सुख आहे. तिला आपला जोडीदार निवडण्याचा, लग्नाचा बाकीचा तपशील निवडण्याचा अधिकार आहे.’

‘संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील’ चित्रपटातून मिळणारा नफा मराठा समाजाच्या मदतीसाठी! निर्मात्यांनी केली मोठी घोषणा

ते पुढे म्हणाले की, ‘सध्या मी दिल्लीतील माझ्या राजकीय कामात खूप व्यस्त आहे. तरीही मी मुंबईत आलो आहे. सध्या माझी मुंबईत असलेली उपस्थितीच हे दर्शवते की, मी केवळ तिचा शक्तीस्तंभ म्हणून नाही, तर तिचे खरे कवच म्हणून येथे उपस्थित आहे. सोनाक्षी आणि झहीरला एकत्र राहायचं आहे. ते एकत्र खूप छान दिसतात.’

शत्रुघ्न सिन्हा बोलले, ‘खामोश…’

यावेळी सगळ्या अफवांवर पूर्ण विराम लावताना शत्रुघ्न सिन्हा म्हणाले की, ‘जे लोक असे खोटे बोलत आहेत, ते या आनंदाच्या प्रसंगाने निराश झाले आहेत. कारण ते खोटे पसरवत आहेत, दुसरे काही नाही. मी अशा लोकांना माझ्या आयकॉनिक डायलॉगद्वारे सावध करू इच्छितो , तो म्हणजे ’खामोश, तुमचा याच्याशी काहीही संबंध नाही. तुम्ही केवळ तुमच्या कामात लक्ष घाला.' शत्रुघ्न सिन्हा यांच्या या प्रतिक्रियेनंतर आता ते लेकीच्या लग्नात साग्भागी होणार हे निश्चित झालं आहे.

Whats_app_banner