मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  शत्रुघ्न सिन्हा यांना रुग्णालयात का दाखल व्हावं लागलं?; त्यांनी स्वत:च दिली माहिती

शत्रुघ्न सिन्हा यांना रुग्णालयात का दाखल व्हावं लागलं?; त्यांनी स्वत:च दिली माहिती

Aarti Vilas Borade HT Marathi
Jul 03, 2024 01:49 PM IST

सोनाक्षी सिन्हाच्या लग्नानंतर काही दिवसांनी शत्रुघ्न सिन्हा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सोनाक्षीही पती जहीरसोबत वडिलांना भेटण्यासाठी रुग्णालयात गेली होती.

shatrughan sinha, sonakshi and zaheer
shatrughan sinha, sonakshi and zaheer

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या लग्नानंतर तिचे वडील आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शत्रूघ्न सिन्हा यांना अस्वस्थ वाटत असल्यामुळे रुग्णालयात दाखल केल्याची माहिती समोर आली होती. आता स्वत: शत्रूघ्न सिन्हा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी प्रकृतीविषयी तसेच मुलगी सोनाक्षीच्या लग्नाबाबातही वक्तव्य केले.

शत्रूघ्न सिन्हा यांनी नुकताच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये शत्रुघ्न यांना विचारण्यात आले की, तुम्ही सोफ्यावरून खाली पडल्याच्या बातम्या येत आहेत? त्यावर टाइम्स नाऊशी बोलताना शत्रूघ्न सिन्हा म्हणाले की, 'मी म्हणेन की लताजींचे एक गाणे होते, मी सोफ्यावरून खाली पडलो. बरं, गंमत सोडली तर सोफ्यावर खाली पडायला माझ्याकडे एवढा वेळ कुठे आहे.' पुढे शत्रूघ्न यांना विचारण्यात आले की, या सगळ्या अफवा कशा सुरु झाल्या. त्यावर उत्तर देत शत्रूघ्न सिन्हा म्हणाले, 'मला माहिती आहे या बातम्या कुठून येतात. पण मला त्या व्यक्तीविषयी वाईट बोलायचे नाही. त्यामुळे दुर्लक्ष करा. माझ्यावर शस्त्रक्रिया झाली आहे त्यामुळे मी फार बोलणार नाही.'
वाचा : गेली ४० वर्षे रजनीकांतसोबत का काम केले नाही? कमल हासन यांनी सांगितले कारण

शत्रूघ्न सिन्हा रुग्णालयात का दाखल झाले?

"माझे नेहमीचे रुटीन चेकअप होते. ज्या व्यक्तींचे वय हे ६० वर्षे आहे त्यांना मी सल्ला देईन की त्यांनी आपला चेकअप करा. निवडणुकीच्या प्रचारासाठी मी बराच प्रवास करत होतो. त्यानंतर माझ्या मुलीचे लग्न झाले. आता मी लहान नाही की मी एका दिवसात तीन शिफ्ट करेन आणि त्यानंतरही रात्री पार्टी करेन" असे शत्रूघ्न म्हणाले. शत्रूघ्न सिन्हा यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून ते घरी आले आहेत.
वाचा : मलायकासोबतच्या ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान अर्जुन कपूरची पोस्ट, वेधले सर्वांचे लक्ष

ट्रेंडिंग न्यूज

सोनाक्षीच्या लग्नावर शत्रूघ्न सिन्हाची प्रतिक्रिया

'माझ्या मुलीचे आताच लग्न झाले आणि हे लग्न व्यवस्थित व आनंदाने पार पडले याचा मला आनंद आहे. देवाच्या कृपेने माझी मुलगी सुखी वैवाहिक जीवन जगत आहे. तिच्या आनंदात माझा आनंद दडला आहे. जे त्यांच्या लग्नामुळे खूश नाहीत त्याविषयी मला काही बोलायचे नाही' असे पुढे शत्रूघ्न म्हणाले.
वाचा : प्रभासच्या 'कल्की 2898 एडी'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, हिंदी व्हर्जनने कमावले कोट्यवधी रुपये

WhatsApp channel