शत्रुघ्न सिन्हाने परत पाठवून दिली होती ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नाची मिठाई! अमिताभ बच्चन यांच्यावर का झालेले नाराज?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  शत्रुघ्न सिन्हाने परत पाठवून दिली होती ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नाची मिठाई! अमिताभ बच्चन यांच्यावर का झालेले नाराज?

शत्रुघ्न सिन्हाने परत पाठवून दिली होती ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नाची मिठाई! अमिताभ बच्चन यांच्यावर का झालेले नाराज?

Jan 21, 2025 01:10 PM IST

Filmy Kissa : ऐश्वर्या आणि अभिषेकने २० एप्रिल २००७ रोजी लग्न केले होते. या लग्नाला बच्चन कुटुंबीय आणि काही जवळचे मित्र उपस्थित होते. अनेक बॉलिवूड स्टार्सचा पाहुण्यांच्या यादीत समावेश नव्हता.

ऐश्वर्या राय बच्चन  अभिषेक बच्चन
ऐश्वर्या राय बच्चन अभिषेक बच्चन

Bollywood Filmy Kissa : बॉलिवूडचा ज्युनिअर बच्चन अर्थात अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या लग्नाची धामधूम आजही लोकांच्या लक्षात आहे. ऐश्वर्या आणि अभिषेकने २० एप्रिल २००७ रोजी लग्न केले होते. या लग्नाला बच्चन कुटुंबीय आणि काही जवळचे मित्र उपस्थित होते. मात्र, या शाही लग्न सोहळ्यात अनेक बॉलिवूड स्टार्सचा पाहुण्यांच्या यादीत समावेश नव्हता. यामुळे अनेक कलाकार नाराज झाले होते. लोकांची नाराजी दूर करण्यासाठी बच्चन कुटुंबीयांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना खास शाही मिठाई पाठवली होती. ज्यांना ते लग्नाला बोलावू शकले नाहीत, त्यांनाच ही मिठाई पाठवण्यात आली होती. पण एका पाहुण्याने आपली मिठाई परत केली होती. ते कोण आहेत आणि त्यांनी असे का केले हे जाणून घेऊया.. 

मिठाई दारातून परत पाठवली!

बॉलिवूडच्या बच्चन कुटुंबाच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका न मिळाल्याने नाराजी व्यक्त करणारा अभिनेता दुसरा कोणी नसून ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा आहे. अमिताभ बच्चन यांच्या घरून निमंत्रण न मिळाल्याने शत्रुघ्न सिन्हा प्रचंड नाराज झाले होते. एकदा मिड-डेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबद्दल सांगितले होते. इतकंच नाही तर, त्यांच्या घरी पाठवण्यात आलेली लग्नाची मिठाई देखील त्यांनी परत का पाठवून दिली होती, याचे कारण देखील सांगितले.  ‘आमंत्रण दिले नसताना ही मिठाई पाठवण्याची औपचारिकता करण्याची काय गरज आहे. मिठाई पाठवण्यापूर्वी अमिताभ किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणीतरी मला फोन करेल, अशी माझी किमान अपेक्षा होती. पण, असे झालेच नाही, तर मिठाई कशाला पाठवायची?’, असे शत्रुघ्न सिन्हा म्हणाले. 

SSR Birthday : इंजिनिअरिंग सोडून अभिनेता बनला, चंद्रवरही जमीन खरेदी केली! सुशांत सिंह राजपूतबद्दल काही खास गोष्टी

अभिषेकने लग्नसोहळा का ठेवला खाजगी?

अभिषेक बच्चनने आपलं लग्न खासगी ठेवण्यामागचं कारण सांगितलं. अभिषेकने 'कॉफी विथ करण' या कार्यक्रमादरम्यान सांगितले होते की, त्याची आजी आजारी असल्याने आणि तिला रुग्णालयात दाखल केल्यामुळे लग्नाला फारसे लोक आमंत्रित करण्यात आले नव्हते. त्यामुळे आमच्या आई-वडिलांनी मिळून सर्वांचे आशीर्वाद घेण्यासाठी कार्ड आणि मिठाई पाठवली. शत्रुघ्न काका वगळता कुणालाही यावर आक्षेप नव्हता. त्यांनी कार्ड आणि मिठाई परत केली होती. आणि त्यांचं असं करणं ठीक आहे, आपण सर्वांना खूश करू शकत नाही.

Whats_app_banner