बॉलिवूडमध्ये सध्या अनेक कलाकार हे लग्नबंधनात अडकताना दिसत आहेत. कियारा अडवाणी, जॅकी भगनानी, तापसी पन्नू आणि इतर काही कलाकार हे नुकताच लग्नबंधनात अडकले आहेत. त्या पाठोपाठ आता अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा देखील विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. सोनाक्षी बॉयफ्रेंड झहीर इक्बालशी लग्न करणार असल्याचे म्हटले जात आहे. यावर स्वत: सोनाक्षीने प्रतिक्रिया दिली आहे.
लग्नाच्या चर्चा रंगत असताना सोनाक्षी सिन्हाचा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये सोनाक्षी लग्न, रोका, मेहेंदी इत्यादी गोष्टींवर प्रतिक्रिया देताना दिसली. ‘का हात धुवून माझ्या लग्नाच्या मागे लागला आहेत?’ असे सोनाक्षी व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने ‘प्रपोजल, रोका, मेहेंदी, संगीत सर्वकाही ठरलं आहे… कृपया तुम्हीच मला याविषयी सांगा…’ असे म्हटले आहे.
वाचा: किडनॅप झालेले अमृता खानविलकर आणि संकर्षण कऱ्हाडे सापडले! कुठे आणि कसे जाणून घ्या सविस्तर
‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये कपिलने अभिनेत्रीला लग्न कधी करते? असे विचारले होते. त्यावर सोनाक्षीने,‘जखमेवर मीठ चोळू नको… तुला माहिती आहे मला लग्नाची किती घाई आहे…’ असे उत्तर देत कपिलला सुनावले होते. आता खरच सोनाक्षी लग्न करत असल्याची माहिती समोर आली आहे.
वाचा: बॉलिवूड अभिनेत्रीने संपवले स्वत:चे आयुष्य, पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह
सोनाक्षी सिन्हा येत्या २३ तारखेला लग्न करणार असल्याचे म्हटले जात आहे. सोनाक्षी बॉयफ्रेंड झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न करणार आहे. तिच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका मॅगझीनच्या मुखपृष्ठाप्रमाणे डिझाइन करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्रिकेवर ‘अफवा खऱ्या आहेत’ असे लिहिण्यात आले आहे. लग्न कुठे होणार याविषयी कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण मुंबईत रिसेप्शन होणार असल्याची माहिती समोर आली आहे. पण याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. सोनाक्षी किंवा झहीरने यावर प्रतिक्रिया दिलेली नाही.
वाचा: सावनीशी लग्न न करण्यासाठी हर्षवर्धनने आखला नवा प्लान, काय असेल मिहिर आणि मुक्ताची प्रतिक्रिया?
सोनाक्षी नुकताच संजय लीला भन्साळी यांच्या ‘हिरामंडी’ या वेब सीरिजमध्ये दिसली होती. तिची या सीरिजमधील भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरली होती. आता लवकरच ती हिरामंडी २ मध्ये दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
संबंधित बातम्या