Shatrughan Sinha In Hospital: बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने अभिनेता झहीर इक्बालसोबत २३ जून रोजी लग्नगाठ बांधली आहे. दोघांनीही आधी रजिस्टर्ड मॅरेज केलं, त्यानंतर त्यांनी मुंबईत ग्रँड रिसेप्शन पार्टी दिली. रिसेप्शनला दोघांच्या कुटुंबातील सदस्यांव्यतिरिक्त बॉलिवूडचे सर्व स्टार्स उपस्थित होते. या पार्टीतील अनेक फोटो आणि व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहेत. दरम्यान, आता एक मोठी बातमी समोर येत आहे. सोनाक्षीच्या लग्नाच्या पाच दिवसांनंतरच तिचे वडील शत्रुघ्न सिन्हा रुग्णालयात दाखल झाले आहेत. शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी आणि जावई त्यांना भेटण्यासाठी रुग्णालयात पोहोचले आहेत. या दरम्यानचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. जाणून घेऊया काय आहे संपूर्ण प्रकरण…
शत्रुघ्न सिन्हा यांना मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शत्रुघ्न सिन्हा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची बातमी समोर येताच त्यांचे चाहते चिंतेत पडले आहेत. पण, चाहत्यांनी घाबरून जाण्याचे काही कारण नाही, असे सांगण्यात येत आहे. शत्रुघ्न यांना रुटीन चेकअपसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लग्नाच्या धावपळीत सोनाक्षीच्या शरीरावर आणि मनावर खूप ताण आला आहे. त्यामुळे त्याची रुटीन चेकअप केली जात आहे.
अशा परिस्थितीत घाबरून जाण्याचे कारण नाही, शत्रुघ्न सिन्हा पूर्णपणे ठीक आहे. सध्या त्यांच्या तब्येतीबाबत अधिक माहिती समोर आलेली नाही. सोनाक्षी सिन्हा आणि तिचा पती झहीर इक्बाल अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांना भेटण्यासाठी रुग्णालयात पोहोचले आहेत. त्यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यात ती कारमधून उतरताना दिसली आहे.
ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी नुकतेच एक्स ट्विटरवर मुलगी सोनाक्षी सिन्हा आणि जावई झहीर इक्बाल यांच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. यासोबत त्यांनी एक खास संदेशही लिहिला आहे. आपल्या आपुलकीने, प्रेमाने आणि शुभेच्छांनी शतकातील सर्वात खास 'लग्न' बनवल्याबद्दल आणि आमच्यासोबत कृतज्ञतेच्या भावनेने हा दिवस साजरा केल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो, असे त्यांनी ट्विटरवर लिहिले आहे. ‘आमची लाडकी लेक सोनाक्षी सिन्हा हिने झहीर इक्बालसोबत तिच्या आयुष्याच्या सुंदर प्रवासात एक नवा अध्याय सुरू केला आहे’, असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.
संबंधित बातम्या