मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Shashi Kapoor Birthday: शशी कपूर यांनी राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारण्यास दिला होता नकार! वाचा भन्नाट किस्सा...

Shashi Kapoor Birthday: शशी कपूर यांनी राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारण्यास दिला होता नकार! वाचा भन्नाट किस्सा...

Harshada Bhirvandekar HT Marathi
Mar 18, 2024 07:44 AM IST

Shashi Kapoor Birth Anniversary Special: शशी कपूर हे असे एकमेव बॉलिवूड अभिनेते आहेत, ज्यांनी राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारण्यास थेट नकार दिला होता.

शशी कपूर यांनी राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारण्यास दिला होता नकार!
शशी कपूर यांनी राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारण्यास दिला होता नकार!

Shashi Kapoor Birth Anniversary Special: कपूर कुटुंबाला बॉलिवूडचे पहिले ‘फिल्मी घराणे’ म्हटले जाते. पृथ्वीराज कपूर ते रणबीर कपूरपर्यंत, या कुटुंबातील प्रत्येक पिढीने जबरदस्त अभिनेते आणि अभिनेत्री मनोरंजन विश्वाला दिल्या आहेत. कपूर कुटुंबाती प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या बॉलिवूडमधील योगदानासाठी ओळखले जाते. यामध्ये अभिनेते शशी कपूर यांच्या नावाचाही समावेश आहे. शशी कपूर यांची आज ८६वी जयंती आहे. शशी कपूर यांचा जन्म १८ मार्च १९३८ रोजी पृथ्वीराज कपूर यांच्या घरी झाला. त्यांचे खरे नाव बलबीर राज कपूर होते. पण सगळे त्यांना प्रेमाने ‘शशी’ म्हणत. शशीचे मोठे भाऊ अभिनेते राज कपूर आणि शम्मी कपूर हे चित्रपटसृष्टीशी संबंधित होते. चित्रपटांची पार्श्वभूमी असणाऱ्या कुटुंबात जन्मलेल्या शशी कपूर यांना लहानपणापासूनच चित्रपटांची आवड होती.

अभिनेते शशी कपूर (Shashi Kapoor) हे त्यांच्या दमदार अभिनय आणि नृत्यासाठी ओळखले जातात. पण, तुम्हाला माहित आहे का, की शशी कपूर हे असे एकमेव बॉलिवूड अभिनेते आहेत, ज्यांनी राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारण्यास थेट नकार दिला होता. चला तर जाणून घेऊया हा किस्सा...

Viral Video: ढोल-नगाडे अन् धमाल… ‘असं’ झालं क्रिती खरबंदाचं सासरी स्वागत! व्हिडीओनं जिंकलं चाहत्यांचं मन

शशी कपूर यांनी दिला थेट नकार

अभिनेते शशी कपूर यांचा हा किस्सा खूप प्रसिद्ध आहे. बॉलिवूड अभिनेते शशी कपूर यांनी काही वर्षांपूर्वी राष्ट्रीय पुरस्कार घेण्यास नकार दिला होता. त्यांच्या व्यतिरिक्त आजपर्यंत कोणीही असे केलेले नाही. १९६१मध्ये रिलीज झालेल्या 'धर्मपुत्र' चित्रपटासाठी शशी कपूर यांना हा पुरस्कार मिळणार होता. ‘धर्मपुत्र’ हा चित्रपट शशी कपूर यांचा मुख्य भूमिकेत असलेला पहिला चित्रपट होता.

कारण जाणून आश्चर्य वाटेल!

शशी कपूर यांनी एवढं मोठं पाऊल का उचललं, असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. २०१२मध्ये स्वतः शशी कपूर यांनी एका मुलाखतीत याबद्दल सांगितले होते. शशी कपूर यांनी राष्ट्रीय पुरस्कार न स्वीकारण्यामागचे कारण सांगताना म्हटले की, १९६१मध्ये आलेल्या 'धर्मपुत्र' चित्रपटातील कामासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. मात्र, त्यांनी हा पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला होता. याचे कारण म्हणजे स्वतः शशी कपूर यांच्या मते ते या पुरस्कारासाठी योग्य नव्हते. ‘धर्मपुत्र’ चित्रपटात त्यांचा परफॉर्मन्स राष्ट्रीय पुरस्कार देण्याइतका चांगला झाला नव्हता. आणि हेच कारण देत त्यांनी थेट हा पुरस्कार नाकारला होता.

Madhurani Prabhulkar: ‘आई कुठे काय’वर संतापले प्रेक्षक! अरुंधती म्हणते ‘इतकी नकारात्मक प्रतिक्रिया...’

पुढे शशी कपूर यांना त्यांच्या कारकिर्दीत तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. २०११मध्ये त्यांना भारत सरकारकडून 'पद्मभूषण' आणि २०१५ मध्ये 'दादासाहेब फाळके पुरस्कार'ही त्यांना देण्यात आला.

IPL_Entry_Point