मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Shashank Ketkar: शशांक केतकरने खरेदी केले नवे घर, फोटो का शेअर केला नाही सांगितले कारण

Shashank Ketkar: शशांक केतकरने खरेदी केले नवे घर, फोटो का शेअर केला नाही सांगितले कारण

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 23, 2024 02:12 PM IST

Shashank Ketkar New Home: शशांकने स्वत: एका मुलाखतीमध्ये याबाबत माहिती दिली आहे. जाणून घ्या शशांकने कुठे घेतले घर?

Shashank Ketkar
Shashank Ketkar

छोट्या पडद्यावरील ‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेतून प्रसिद्धीच्या झोतात आलेला अभिनेता म्हणजे शशांक केतकर. या मालिकेने तो महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला. शशांक हा त्याच्या मालिका, चित्रपटांसोबतच खासगी आयुष्यामुळे कायमच चर्चेत असतो. नुकताच शशांकने नवे घर घेतल्याची माहिती दिली आहे. पण याबाबत कोणतीही पोस्ट किंवा फोटो शेअर न केल्याची माहिती देखील दिली आहे.

शशांक केतकर हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. तो चाहत्यांसोबत सतत फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतो. काही दिवसांपूर्वी त्याने नवी कार खरेदी केली होती. पर्यावरणाला हानी होऊ नये म्हणून त्याने इलेक्ट्रीक कार खरेदी केली. त्याच वेळी त्याने नवे घर देखील खरेदी केले. मात्र, याबाबत त्याने माहिती दिली नव्हती. नुकताच त्याने दिलेल्या एका मुलाखतीमध्ये याबाबत खुलासा केला आहे.
वाचा: "ऐतिहासिक क्षणांची साक्षीदार झाल्याचा अभिमान", जिनिलिया देशमुखची पोस्ट व्हायरल

अभिनेता शशांक केतकरने 'पुढारी' या वृत्तवाहिनीशी बोलताना नवे घर खरेदी केल्याचा खुलासा केला. “मी गाडी डिसेंबरमध्येच घेतली. आणखी एक खूप छान गोष्ट म्हणजे मी नवे घरही घेतले आहे. मी त्याचे फोटो सोशल मीडियावर टाकले नाहीत. कारण मला सोशल मीडियावर सतत फोटो टाकायला आवडत नाही. काही घेतले की टाका फोटो, हे आवडत नाही. आपल्या कुटुंबातच या गोष्टी साजऱ्या कराव्यात असे मला वाटते” असे शशांक म्हणाला.

शशांकच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तो गेल्या अडीच वर्षांपासून ‘मुरांबा’ या लोकप्रिय मालिकेत काम करताना दिसत आहे. या मालिकेतील त्याच्या भूमिकेचे विशेष कौतुक झाले होते. त्यानंतर तो हंसल मेहता यांच्या ‘तेलगी स्कॅम २००३’ या वेब सीरिजमध्ये दिसला होता.

WhatsApp channel